व्हाटसअ‍ॅपवरील ऑडिओ व व्हिडीओ कॉलींग होणार सोपे !

0

गुगल असिस्टंटवर आता व्हाटसअ‍ॅपवरून करण्यात येणार्‍या ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलींगचा सपोर्ट देण्यात आलेला असल्याने ही प्रक्रिया सुलभ होणार आहे.

व्हाटसअ‍ॅपवरून आपण ऑडिओ (ध्वनी) आणि व्हिडीओ (चलचित्र) या दोन्ही प्रकारांमधील कॉलींग करू शकतो. आता ही प्रक्रिया अजून सोपी होणार आहे. कारण गुगल असिस्टंटला आता या दोन्ही प्रकारच्या कॉलींगचा सपोर्ट देण्यात आला आहे. गुगलने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. यानुसार, पहिल्या टप्प्यात ही सुविधा अँड्रॉइड युजर्सला देण्यात येत असून आयओएसबाबत मात्र माहिती देण्यात आलेली नाही.

गुगल असिस्टंट हा व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीवर चालणारा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट असून याचा स्मार्टफोनसह अन्य उपकरणांमध्ये विपुल प्रमाणात वापर होत आहे. गुगल असिस्टंटच्या मदतीने आधी काही थर्ड पार्टी अ‍ॅप्समधील संदेश वाचन करण्याची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. यात व्हाटसअ‍ॅप मॅसेज वाचनाची सुविधा अजून प्रयोगात्मक अवस्थेत आहेत. हे फिचर देण्याआधीच आता गुगल असिस्टंटच्या मदतीने व्हाटसअ‍ॅपचे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. याचा वापर करण्यासाठी युजरला फक्त ”हे गुगल व्हॉटसअ‍ॅप व्हिडीओ (युजरचे नाव)” असे म्हणायचे आहे. याच प्रकारे ऑडिओ म्हटल्यास ध्वनी वार्तालाप करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here