गुगल ड्युओवर स्टोरी फिचर

0
ड्युओ, google duo

स्नॅपचॅटच्या स्टोरी या फिचरची नक्कल करत गुगल ड्युओने आपल्या युजर्सला फोटो शेअर करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

टिन एजर्समध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणार्‍या स्टोरीज या फिचरची फेसबुकसह अनेक कंपन्यांनी कॉपी केली आहे. स्टोरीज म्हणजे २४ तासांमध्ये नष्ट होणारे पोस्ट, प्रतिमा, व्हिडओ वा अ‍ॅनिमेशन होय. फेसबुकवर स्टोरीज हे फिचर देण्यात आले असून याला इन्स्टाग्रामवरही सादर करण्यात आले आहे. तर व्हाटसअ‍ॅपवर स्टेटसच्या माध्यमातून याचीच कॉपी करण्यात आली आहे. आता नेमके याच स्वरूपाचे फिचर हे गुगल ड्युओ अ‍ॅपवरही उपलब्ध करण्यात आलेले आहे.

गुगल ड्युओ हे व्हिडीओ कॉलींग अ‍ॅप असून याला युजर्सची पसंती मिळाली आहे. जगभरात याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यावर आता कुणीही युजर फोटो शेअर करू शकतो. हा शेअर केलेला फोटो २४ तासांनी आपोआप नष्ट होणार आहे. अर्थात, हे फिचर स्टोरीज प्रमाणेच असेल हे स्पष्ट झाले आहे. मात्र या फिचरमध्ये स्टोरीजपेक्षा थोडा फरक आहे. स्टोरीज ही संबंधीत युजर्सच्या फ्रेंड लिस्टमधील सर्वांना स्टोरीज दिसू शकते. तर ड्युओज अ‍ॅपमध्ये मात्र फक्त एका युजरलाच स्टोरी पाहता येणार आहे. अर्थात ड्युओ अ‍ॅप वापरणारा युजर हा दुसर्‍या युजरला फोटो पाठवू शकतो. नंतर हा फोटो २४ तासांनी आपोआप नष्ट होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. ड्युओच्या व्ही ५६ या अपडेटमध्ये हे फिचर युजर्सला वापरण्यासाठी मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here