स्मार्टफोनचे व्यसन सोडविण्यासाठी गुगलची भन्नाट आयडिया !

0

स्मार्टफोनच्या व्यसनाबद्दल जगभरात चिंता व्यक्त केली जात असतांना आता गुगलने यावर एका अ‍ॅपच्या माध्यमातून उपाय शोधून काढला आहे.

जगभरात अब्जावधी लोक स्मार्टफोनचा वापर करत आहेत. यातील बहुतांश फिचर्स हे आधुनीक जीवनशैलीतील अविभाज्य घटक असल्यामुळे याचा वापर अत्यावश्यक झालेला आहे. तथापि, आता अनेकांना स्मार्टफोनचे व्यवनदेखील जडल्याचे दिसून येत आहे. याचे अनेक शारीरीक आणि मानसिक दुष्परिणाम समोर आले असून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. नेमके याच प्रकारातील स्मार्टफोनचे व्यसन दूर करण्यासाठी गुगलने पुढाकार घेतला आहे. गुगल विविध क्षेत्रांमध्ये सखोल संशोधन करत असून यातून अनेक प्रयोगात्मक पातळीवरील प्रोजेक्ट समोर आले आहेत. याच प्रकारचा पेपर फोन हा प्रोजेक्ट आता प्रगतीपथावर असून गुगलने याची माहिती एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून जाहीर केली आहे.

पेपर फोन हे स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन आहे. याला इन्स्टॉल केल्यानंतर याचा वापर स्मार्टफोनचे अ‍ॅडीक्शन सोडविण्यासाठी होणार असल्याचा दावा गुगलने केला आहे. कुणीही युजर स्मार्टफोनचा वापर हा मर्यादीत कामांसाठी करत असतो. यात प्रामुख्याने कॉलींग, नेव्हिगेशन, रिमाइंडर आदी कामांचा समावेश आहे. पेपर फोन अ‍ॅपमध्ये याचाच वापर करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत युजरला दिवसभरात नेमके स्मार्टफोनचे किती आणि कशा प्रकारचे काम पडणार आहे याची माहिती कॉन्टॅक्ट, मॅप्स, प्लॅनींग, रिमाइंडर आदींच्या माध्यमातून जमा केली जाते. यानंतर संबंधीत स्मार्टफोनशी संलग्न असणार्‍या प्रिंटरवरून याची प्रिंट दिली जाते. अर्थात, नंतर दिवसभर स्मार्टफोन न वापरता त्या प्रिंटवरील नियोजनानुसार युजर आपली कामे करू शकतो.

पेनर फोन अ‍ॅपचा वापर केल्यास युजरचे स्मार्टफोनवर अवलंबून असणे हे बर्‍याच प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा आहे. सध्या हे अ‍ॅप प्रयोगात्मक अवस्थेत असून याचा सोर्स कोड डेव्हलपर्ससाठी खुला करण्यात आलेला आहे. तथापि, लवकरच हे अ‍ॅप सर्व युजर्सला गुगल प्ले स्टोअरवरून उपलब्ध करून देण्यात येईल असे गुगलने जाहीर केले आहे.

खालील व्हिडीओत पहा पेपर फोनची कार्यप्रणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here