गुगलवरील संग्रहीत माहिती ‘ऑटो डिलीट’ करण्याची सुविधा

0

गुगलने आपल्या युजर्ससाठी लोकेशनसह अन्य संग्रहीत होणारी माहिती स्वयंचलीत पध्दतीत नष्ट करण्याचे फिचर सादर केले आहे.

गुगलवर युजरनी अनेक प्रकारची माहिती संग्रहीत होत असते. यात सर्च केलेल्या टर्म्स, भेट दिलेली संकेतस्थळे, लोकेशन्स आदींसह विविध अ‍ॅप्लीकेशन्सवरील लॉगीन्सच्या माहिती समावेश असतो. गुगलने आधीच सेटींगच्या माध्यमातून यातील माहितीच्या संग्रहावर बर्‍यापैकी नियंत्रण ठेवण्याची सुविधा दिलेली आहे. आता मात्र याच्याही पुढे जाऊन ही माहिती अ‍ॅटोमॅटीक अर्थात स्वयंचलीत पध्दतीत नष्ट करण्याची सुविधा ही ‘ऑटो डिलीट’ या फिचरच्या माध्यमातून प्रदान करण्यात आली आहे. गुगलने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याची सविस्तर माहिती दिली आहे.

यानुसार कुणीही आपल्या गुगल अकाऊंटवर जाऊन सेटींगमध्ये जायचे आहे. येथील ‘वेब अँड अ‍ॅप अ‍ॅक्टीव्हिटी’ या भागामध्ये जाऊन स्वयंचलीत पध्दतीत डाटा डिलीट करण्याचा पर्याय निवडावा लागणार आहे. सध्या गुगलने युजरला ३ महिने ते १८ महिने या कालखंडाचे पर्याय दिलेले आहेत. यापैकी युजरने जर तीन महिन्यांचा पर्याय निवडला तर यानंतर (तीन महिन्यानंतर) संबंधीत युजरची गुगलवर असणारी वेब व अ‍ॅप अ‍ॅक्टीव्हिटीची संग्रहीत माहिती आपोआप डिलीट होणार आहे. हे फिचर डेस्कटॉपसह अँड्रॉइड व आयओएस प्रणालीसाठी सादर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात याला लोकेशन हिस्ट्रीसाठी लागू करण्यात आले असून लवकरच वेब व अ‍ॅपसाठीही याला कार्यान्वित केले जाणार आहे.

खालील अ‍ॅनिमेशनमध्ये गुगलच्या ‘ऑटो डिलीट’ टुलबाबत माहिती दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here