आता सेल्फीला कवितेत परिवर्तीत करणारे टुल !

0

गुगलने आता चक्क सेल्फी प्रतिमेला कवितेत परिवर्तीत करणारे टुल सादर केले असून यात कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात आला आहे.

आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेवर प्रचंड प्रमाणात काम सुरू आहे. याचा वापर विविध क्षेत्रांमध्ये करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमिवर गुगलने आता पोएम पोर्ट्रेट हा नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट सुरू केला आहे. याच्या अंतर्गत शब्दांना सेल्फी प्रतिमेसह कवितेत परिवर्तीत करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी युजरला http://g.co/poemportraits या संकेतस्थळावर जावे लागेल. येथे त्याला हवा असणारा एक शब्द भरावा लागेल. यानंतर संबंधीत युजरची सेल्फी घेऊन याला अपलोड करावे लागेल. यानंतर काही क्षणांमध्येच या सेल्फीला एका कवितेमध्ये परिवर्तीत करून सादर करण्यात येते. यात संबंधीत सेल्फीवर त्या कवितेचे शब्द अंकीत असतात.

या टुलमध्ये कोणत्याही शब्दाशी सुसंगत अशी एकोणाविसाव्या शतकातील शैलीनुसार कविता तयार करण्यात येते. याला पोएम पोर्ट्रेट असे नाव देण्यात आलेले आहे. गुगलच्या आर्ट अँड कल्चर विभागाने हे टुल विकसित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here