….अरेच्चा आता गुगलचे व्हर्च्युअल व्हिजीटींग कार्ड !

0

गुगलने भारतीय युजर्ससाठी व्हर्च्युुअल व्हिजीटींग कार्ड तयार करण्याची सुविधा दिली असून ते गुगल सर्चमध्ये दिसणार आहे.

गुगलने गत जवळपास दोन वर्षांपासून व्हर्च्युअल व्हिजीटींग कार्डची चाचणी घेतली. अनेकदा ही सुविधा युजर्सला मिळणार असल्याचे संकेत मिळाले होते. तथापि, खूप विलंबाने का होईना आता हे फिचर भारतीय युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. याला पीपल्स कार्ड या नावाने सादर करण्यात आले आहे.

व्हर्च्युअल कार्ड हे नावातच नमूद असल्यानुसार आभासी कार्ड या स्वरूपातील असणार आहे. यात संबंधीत युजरचे नाव, त्याचा मोबाईल क्रमांक, वेबसाईट (असल्यास); सोशल प्रोफाईल्स आदी माहिती असणार आहे. अर्थात, एखाद्या खर्‍याखुर्‍या व्हिजीटींग कार्ड प्रमाणेच हे आभासी कार्ड असणार आहे. याची माहिती गुगल सर्चमध्ये दिसणार आहे. अनेकदा एखाद्या व्यक्तीची फेक वा दिशाभूल करणारी माहिती गुगल सर्चमध्ये दिसत असते. याला आळा घालण्याचे काम गुगलचे व्हर्च्युअल कार्ड करणार असल्याची माहिती गुगलतर्फे देण्यात आलेली आहे.

कुणीही युजर सहजपणे आपले व्हर्च्युअल व्हिजीटींग कार्ड तयार करू शकतो. यासाठी युजरला स्मार्टफोनवरून त्याच्या गुगल अकाऊंटला लॉगीन करावे लागेल. यानंतर गुगलवरच Add to search हे शोधून यात दिलेल्या सूचनांप्रमाणे आपली माहिती द्यावी लागणार आहे. यानंतर संबंधीत युजरचे व्हर्च्युअल व्हिजीटींग कार्ड हे गुगल सर्चमध्ये दिसू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here