गुगल मॅप्सवर येणार ‘ऑफ रूट अलर्ट’ फिचर

0

गुगल मॅप्सवर ‘ऑफ रूट अलर्ट’ या फिचरची चाचणी सुरू करण्यात आली असून याची सुविधा खास भारतीय युजर्सला मिळणार आहे.

गुगल मॅप्सने अलीकडच्या काळात भारतीय युजर्ससाठी अनेक उत्तमोत्तम फिचर्स प्रदान केले आहेत. यात लवकरच ‘ऑफ रूट अलर्ट’ या नवीन फिचरची भर पडणार आहे. सध्या याची चाचणी सुरू असून ही सुविधा भारतीय युजर्सला देणार असल्याची माहिती समोर आली असून याबाबत एक्सडीए या टेक पोर्टलने सविस्तर वृत्त प्रकाशित केले आहे. हे फिचर टॅक्सी अथवा कॅबमधून प्रवास करतांना युजर्सच्या उपयोगात येणार आहे. अनेकदा टॅक्सी चालक हे रस्ता चुकवून प्रवाशांना लुटत असल्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. तर याच प्रकारे महिला प्रवाशांवर अनेकदा शारीरीक अत्याचारदेखील होतात. याला आळा घालण्यासाठी ऑफ रूट ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. याच्या अंतर्गत कुणाही युजरने गुगल मॅप्समध्ये आपला रूट फिड केल्यानंतर जर टॅक्सी वा कॅब चालक त्याशिवाय दुसर्‍या मार्गाने गेल्यानंतर याची माहिती युजरला अलर्टच्या माध्यमातून कळणार आहे. यामुळे युजरला तात्काळ आपण चुकीच्या मार्गावरून जात असल्याची माहिती मिळून तो सावध होऊ शकणार आहे.

‘ऑफ रूट अलर्ट’ हे फिचर सध्या प्रायोगिक अवस्थेत असून येत्या काही दिवसांमध्ये याला अँड्रॉइड व आयओएस प्रणालीच्या युजर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती या वृत्तामध्ये देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here