सुरक्षित प्रवासासाठी गुगल मॅप्सवर येणार ‘हे’ खास फिचर

0
गुगल मॅप्स, google maps

गुगल मॅप्सवर लवकरच लायटनींग हे फिचर येणार असून सध्या याची चाचणी सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे.

अलीकडच्या काळात गुगल मॅप्सवर अनेकविध फिचर्स प्रदान करण्यात येत आहेत. यात लवकरच लायटनींग या फिचरची भर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे फिचर पहिल्यांदा एक्सडीए डेव्हलपर्सला आढळून आले असून त्यांनी याबाबतची माहिती एका वृत्ताच्या स्वरूपात मांडली आहे. यानुसार लायटनींग हे फिचर सध्या चाचणीच्या अवस्थेत आहे. याच्या माध्यमातून युजरला तो जात असणार्‍या मार्गावर रात्री विद्युत दिव्यांची व्यवस्था आहे की नाही ? याची माहिती अचूकपणे मिळणार आहे. ज्या रस्त्यावर पथदिव्यांची व्यवस्था असेल त्यावर पिवळ्या रंगाचा लेअर दर्शविण्यात येणार आहे. अर्थात, या रस्त्यावरून रात्री प्रवास करणे सुरक्षित असल्याचे युजरला समजू शकणार आहे. यात ज्या रस्त्यावर लाईट आहेत की कमी प्रमाणात आहेत याची माहिती यात देण्यात येणार आहे. आणि जर संबंधीत रस्त्यावरील पथदिव्यांचा डाटा नसेल तर तसे यावर स्पष्टपणे नमूद केले जाणार आहे.

अलीकडच्या काळात रात्रीचा प्रवास अतिशय असुरक्षित झालेला आहे. या पार्श्‍वभूमिवर, कोणत्या रस्त्यावर पथदिवे आहेत ही माहिती मिळाल्यास वाहनधारक अथवा पायी चालणार्‍यांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन लायटनींग हे फिचर प्रदान करण्यात येत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here