गुगल उभारणार स्मार्ट सिटी

0

गुगलने आता स्मार्ट सिटीची उभारणी करण्याची घोषणा केली असून टोरांटो शहरानजीक याला विकसीत करण्यात येणार आहे.

गुगलची मुख्य कंपनी असणार्‍या अल्फाबेटने विविध क्षेत्रांमध्ये आपले पाय भक्कम रोवण्यास प्रारंभ केलेला आहे. तसेच आपल्या अनेक उपकंपन्यांच्या माध्यमातून विविधांगी संशोधनदेखील सुरू करण्यात आले आहे. या अनुषंगाने अल्फाबेटची मालकी असणार्‍या साईड लॅब्ज या कंपनीने आता स्मार्ट सिटी उभारण्याची तयारी सुरू केली आहे. कॅनडाची राजधानी असणार्‍या टोरांटो महानगराच्या जवळच ही स्मार्ट सिटी तयार करण्यात येणार असून याबाबतची मंजुरी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे.

टोरांटोच्या पूर्व दिशेला असणार्‍या वॉटरफ्रंट या भागात गुगलची स्मार्ट सिटी वसवण्यात येणार आहे. वॉटरफ्रंट टोरांटो, स्थानिक प्रशासन आणि साईड वॉक लॅब्ज या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने याला विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या वसाहतीमध्ये पर्यावरणाला कोणताही हानी पोहचणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. येथील गृहसंकुले आणि व्यावसायिक संकुलांमध्ये बांधकामाची पर्यावरणानुकुल पध्दती वापरली जाणार आहे. येथील वाहतूक ही प्रामुख्याने सार्वजनीक वाहतूक प्रणाली तसेच पायदळ व सायकलसारख्या पर्यावरणाला अनुकुल असणार्‍या प्रकारातून होणार आहे. यामुळे या भागात प्रदूषणाची समस्या नसेल. या सिटीत नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध असतील. तर येथील सर्व सुविधांना डिजीटल आयाम प्रदान करण्यात येणार आहे. या १२ एकर परिसरात जगातील सर्वात आधुनीक तंत्रज्ञानाचा वापर याच्या डिजीटायझेशनसाठी करण्यात येणार आहे.

टोरांटो शहरातील अन्य ठिकाणांपेक्षा येथील जागा हा तब्बल ४० टक्के कमी दराने उपलब्ध होती. येत्या २० वर्षात येथून थेट ४४ हजार प्रोफेशनल्सला रोजगार मिळणार असून या परिसरातून दरवर्षी तब्बल १४.२ अब्ज कॅनेडियन डॉलर्स इतकी उलाढाल होणार असल्याचे साईडवॉक लॅब्जने जाहीर केले आहे. मार्च २०२० पासून याची प्रत्यक्ष उभारणी सुरू होणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here