टिकटॉकला टक्कर देण्यासाठी गुगल सज्ज

0

टिकटॉक या शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी गुगल लवकरच फायरवर्क या याच प्रकारातील अ‍ॅपला खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

टिकटॉक या व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅपने अक्षरश: धमाल केलेली आहे. बाईट डान्स या चीनी कंपनीची मालकी असणार्‍या टिकटॉकने तरूणाईला वेड लावले आहे. विशेष बाब म्हणजे जगभरात टिकटॉक लोकप्रिय झाले असल्याने आता अन्य कंपन्यादेखील शॉर्ट व्हिडीओ या प्रकारात रस दाखवू लागल्या आहेत. मध्यंतरी फेसबुकदेखील टिकटॉकच्या यशाने प्रभावीत होऊन याच प्रकारातील अ‍ॅप विकसित करत असल्याची माहिती समोर आली होती. या अनुषंगाने फेसबुकने लास्सो हे स्वतंत्र अ‍ॅप सादर केले असून ते सध्या फक्त अमेरिकेत उपलब्ध आहे. हे अ‍ॅप लवकरच अन्य देशांमध्ये लाँच करण्यात येणार आहे. तर आता गुगल या ख्यातप्राप्त कंपनीनेही टिकटॉकला स्पर्धा निर्माण करण्याची तयारी केल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गुगल लवकरच फायरवर्क हे अ‍ॅप खरेदी करण्याची शक्यता आहे. फायरवर्कदेखील टिकटॉकप्रमाणे अतिशय मनोरंजक पध्दतीत शॉर्ट व्हिडीओ तयार करून शेअर करण्याची सुविधा देते. ही कंपनी सध्या स्टार्टप असून याचे मूल्य १० कोटी डॉलर्सच्या आसपास आहे. याची मालकी असणार्‍या लूप न्यू टेक्नॉलॉजीज या कंपनीसोबत गुगलची बोलणी सुरू असून लवकरच याबाबत निर्णय होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

फायरवर्क हे काही बाबतीत टिकटॉकपेक्षा भिन्न आहे. यात १५ ऐवजी ३० सेकंदाचा लूप व्हिडीओ शेअर करता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात एकाच वेळेस स्मार्टफोनमधून उभा (व्हर्टीकल) आणि आडवा (हॉरीझाँटल) या दोन्ही प्रकारातील व्हिडीओ चित्रीत करून याला भन्नाट इफेक्ट देऊन शेअर करता येणार आहे.

डाऊनलोड लिंक ( अँड्रॉइड ) : https://play.google.com/store/apps/details?id=com.loopnow.kamino&hl=en_IN

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here