गुगल शिकवणार शब्दांचे अचूक उच्चार !

0
new-google-logo

गुगलने आता सर्च रिझल्टमध्ये कोणत्याही शब्दाचा उच्चार अचूकपणे शिकण्याची सुविधा देणारे फिचर आता युजर्ससाठी सादर केले आहे.

गुगल आपल्या युजर्सला नवनवीन फिचर्स सादर करत असते. यात एका नाविन्यपूर्ण सुविधेची भर पडणार आहे. या संदर्भात गुगलने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. यानुसार आता अमूक-तमुक शब्दाचा उच्चार कसा करावा असे सर्च केल्यास सर्च रिझल्टमध्ये आधीप्रमाणे संबंधीत शब्दाचा उच्चार हा ध्वनीसह दिला जाईल. याच्या खाली त्या शब्दाचा उच्चार अचूकपणे करण्याचा विभाग दिला जाईल. यावर क्लिक केल्यानंतर युजरला आपल्या स्मार्टफोनच्या मायक्रोफोनवरून त्या शब्दाचा उच्चार करावा लागेल. हा उच्चार चूकल्यास तसे लागलीच सांगण्यात येईल. तर अचूक उच्चार झाल्यानंतर ओके असा रिझल्ट दर्शविण्यात येईल. या माध्यमातून कुणीही गुगलसोबत बोलून त्या शब्दाचा अचूक उच्चार शिकू शकतो. यासोबत आता वरीलप्रमाणेच अमुक-तमूक शब्दाचा उच्चार कसा करावा असे सर्च केल्यास त्या शब्दाशी संबंधीत प्रतिमा सर्च रिझल्टमध्ये दिसेल. एका शब्दाशी संबंधीत अनेक प्रतिमा असल्यास यातून युजरला अचूकपणे निवडण्याची सुविधादेखील मिळणार आहे. ही इमेज दाखवतांना याच्या अनुवादाची सुविधादेखील आता मिळणार आहे. या दोन्ही फिचर्सचा युजर्सला उपयोग होणार असल्याचा आशवाद गुगलतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

गुगलने हे फिचर्स मशीन लर्नींग या तंत्रज्ञानाच्या मदतीने युजर्सला सादर केली आहेत. हे दोन्ही फिचर्स अँड्रॉइड आणि आयओएस युजर्सला क्रमाक्रमाने प्रदान करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

खालील अ‍ॅनिमेशन्समध्ये गुगलचे हे नवीन फिचर्स नेमके कसे काम करणार याची माहिती देण्यात आलेली आहे.

पहा : गुगलच्या या नवीन फिचरबाबत माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here