देशात चार्जींग स्थानकांसाठीची नियमावली जाहीर

0

इलेक्ट्रीक वाहनांसाठी देशभरात चार्जींग स्टेशन्स उभारण्याबाबत केंद्र सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

देशात इलेक्ट्रीक वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होतांना दिसत आहे. यातच केंद्र सरकारने ई-वाहनांना प्राधान्य देण्याचे धोरण आखले आहे. भारतात २०३० पर्यंत किमान २५ टक्के वाहने हे विजेवर चालणारे असतील असे मानले जात आहे. संबंधीत वाहनांसाठी चार्जींग स्टेशन्सदेखील अपरिहार्य आहेत. या अनुषंगाने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने हे स्टेशन्स उभारण्यासाठी दिशानिर्देश देणारी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार राष्ट्रीय महमार्गावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी १०० किलोमीटर अंतरात किमान एक चार्जींग स्टेशन आवश्यक आहे. तर अन्य मार्गांवर प्रत्येकी २५ किलोमीटरला एक असे स्टेशन हवे आहे. हे निर्देश प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासीत प्रदेशाच्या प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. यानुसार प्रत्येक राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशाने आपापल्या अखत्यारीत चार्जींग स्टेशन्स उभारण्याची परवानगी द्यावी असे सुचविण्यात आले आहे.

भारतात ई-वाहने लोकप्रिय होऊ लागली आहेत. मात्र चार्जींग स्टेशन्सचा अभाव हा याच्या वापरातील सर्वात मोठा अडसर आहे. या पार्श्‍वभूमिवर, केंद्र सरकारने आता चार्जींग स्टेशन्सबाबत नियमावली जाहीर केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here