हिरो मॅस्ट्रो एज १२५ (२०१९) दुचाकी दाखल

0

हिरो मोटोकॉर्प कंपनीने मॅस्ट्रो एज १२५ (२०१९) ही दुचाकी भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

हिरो मॅस्ट्रो एज १२५ (२०१९) या मॉडेलला तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे. याचे ड्रम ब्रेक व्हेरियंटचे एक्स-शोरूम मूल्य ५८,५००; डिस्क ब्रेकचे ६०,००० तर फ्युएल इंजेक्टेड आवृत्ती ६२,७०० रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे. या मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे यात वाढीव अर्थात १२५ सीसी क्षमतेचे इंजिन प्रदान करण्यात आले आहे. हे इंजिन हिरोच्या डेस्टीनी मॉडेलमधील असणार आहे.

हिरो मॅस्ट्रो एज १२५ (२०१९) या मॉडेलमध्ये अनेक सरस फिचर्स आहेत. यामध्ये एक्सटर्नल फिलर कॅप, सीटखालील युएसबी चार्जर, मल्टी-फंक्शन की, डिजी-अ‍ॅनालॉग डॅश बोर्ड आदींचा समावेश आहे. सध्या १२५ सीसी क्षमतेच्या वर्गवारीत उपलब्ध असणार्‍या टिव्हीएस एनटॉर्क १२५, होंडा अ‍ॅक्टीव्हा १२५ आणि सुझुकी अ‍ॅक्सेस १२५ हा मॉडेल्सशी टक्कर घेऊन मॅस्ट्रो एज १२५ (२०१९) या मॉडेलला बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here