फ्लिपकार्टवरून मिळणार ऑनर बँड ५

0

ऑनरने भारतीय ग्राहकांसाठी ऑनर बँड ५ हा फिटनेस ट्रकर लाँच केला असून याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले आहे.

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने गेल्या महिन्यातच चीनमध्ये ऑनर बँड ५ हे मॉडेल लाँच केले होते. आता याला भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याचे मूल्य २,५९९ रूपये असून ग्राहक याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकतात. या मॉडेलमध्ये ०.९५ इंच आकारमानाचा आणि २४० बाय १२० पिक्सल्स क्षमतेचा अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले वॉटरप्रूफ असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

ऑनर बँड ५ या मॉडेलच्या मदतीने दहा विविध प्रकारच्या अ‍ॅक्टीव्हिटीजचे ट्रॅकींग करता येणार आहे. यात निद्रेचे मापन, चाललेले अंतर, वापरण्यात आलेल्या कॅलरीज आदींसह अन्य प्रकारांचा समावेश आहे. यात स्लीप मॉनिटर असल्यामुळे सहा भिन्न प्रकारच्या निद्रेशी संबंधीत व्याधींना समजणे सोपे होणार आहे. तर यात अविरतपणे चालणारे हार्ट रेट मॉनिटरदेखील दिलेले आहे. यात ब्लड ऑक्सीजन लेव्हल सेन्सर असल्यामुळे युजरच्या रक्तातील ऑक्सीजनची मात्रा तपासता येणार आहे. याच्या जोडीला यात ६-अ‍ॅक्सीस अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरस्कोप आदी सुविधा दिलेल्या आहेत. यात दर्जेदार बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर १४ दिवसांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. ऑनर बँड ५ साठी कंपनीने स्वतंत्र अ‍ॅप सादर केले असून ते अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी वापरता येणार आहे. यात युजरला आपल्या सर्व हेल्थ अ‍ॅक्टीव्हिटीवर नजर ठेवता येणार असून याच्याशी संबंधीत सर्व माहिती एकाच ठिकाणी पाहता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here