व्हाटसअ‍ॅप ग्रुपमध्ये इतरांनी अ‍ॅड करण्याच्या त्रासापासून स्वत:चा बचाव कसा कराल ?

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपने आता कुणीही अन्य युजरला ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यास मज्जाव करणारे फिचर सादर केले आहे. येथे आपल्याला या त्रासापासून मुक्ती मिळवण्याच्या स्टेप्स दिलेल्या आहेत.

व्हाटसअ‍ॅपने आता युजर्ससाठी अतिशय महत्वाचे फिचर प्रदान केले आहे. याच्या अंतर्गत आता दुसर्‍या युजरला कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याआधी त्याची परवानगी आवश्यक करण्यात आलेली आहे. हे फिचर अतिशय महत्वपूर्ण असे आहे. कारण कुणीही सोम्या-गोम्या हा दुसर्‍या युजर्सला आपल्या ग्रुपमध्ये सहजपणे अ‍ॅड करत असतो. याचा महिलांना खूप त्रास होतो. बर्‍याचदा महिलांना एखाद्या ग्रुपमध्ये जबरदस्तीने अ‍ॅड करून त्यात अश्‍लील कंटेंट शेअर करण्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत पोलीस स्थानकांमध्ये अनेकदा तक्रारीदेखील दाखल झालेल्या आहेत. या पार्श्‍वभूमिवर, व्हाटसअ‍ॅपने आपल्या बीटा म्हणजेच प्रयोगात्मक आवृत्तीच्या युजर्ससाठी हे महत्वाचे फिचर दिले आहे. आपण याला पुढील प्रकारे वापरू शकतात.

१) आपण व्हाटसअ‍ॅपच्या बीटा आवृत्तीसाठी साइनअप केलेले असावे. केले नसल्यास या लिंकवर क्लिक करून आपण याची नोंदणी करू शकतात.

२) गुगल प्ले स्टोअरवर जाऊन व्हाटसअ‍ॅपला अपडेट करून घ्या.

३) व्हाटसअ‍ॅप मॅसेंजर ओपन करून सेटींग या विभागात जाऊन अकाऊंट हा भाग ओपन करा.

४) अकाऊंट विभागातील प्रायव्हसीवर क्लिक करून ग्रुपवर क्लिक करा.

५) येथे आपल्याला एव्हरीवन, माय कॉन्टॅक्ट आणि नोबडी असे तीन पर्याय दिसतील.

६) यात आपल्याला हव्या त्या प्रकारचा पर्याय आपण निवडू शकता. यात एव्हरीवनचा पर्याय निवडल्यास आपल्याला कुणीही त्याच्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकतो. माय कॉन्टॅक्ट निवडल्यास आपण सेव्ह केलेल्या मोबाईल क्रमांकांचे युजर्स आपल्याला ग्रुपमध्ये सहभागी करू शकतात. तर तिसरा म्हणजेच नोबडी हा पर्याय निवडल्यास जगातील कोणताही व्हाटसअ‍ॅप युजर आपल्याला त्याच्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकणार नाही.

खाली दिलेल्या इमेजमध्ये या स्टेप्स दिलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here