व्हाटसअ‍ॅपवर अ‍ॅनिमेटेड स्टीकर्स कसे वापराल ? : जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप माहिती

0

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरवर आता अ‍ॅनिमेटेड स्टीकर्स वापरण्याची सुविधा देण्यात आली असून पहिल्या टप्प्यात चार पॅक उपलब्ध करण्यात आले आहेत. आपण स्वत: हे स्टीकर्स डाऊनलोड करून वापरू शकतात.

गेल्या आठवड्यातच व्हाटसअ‍ॅपवर अ‍ॅनिमेटेड स्टीकर्सचा सपोर्ट प्रदान करण्यात आल्याची माहिती व्हाटसअ‍ॅपच्या सर्व आगामी फिचर्सबाबत तंतोतंत माहिती देणार्‍या WaBetaInfo या संकेतस्थळाने दिली होती. यानंतर व्हाटसअ‍ॅपने अधिकृतपणे याबाबत घोषणा केली आहे. यानुसार आता व्हाटसअ‍ॅपची ताजी आवृत्ती अपडेट असणारा युजर या प्रकारातील स्टीकर्स वापरू शकणार आहे.

याआधी व्हाटसअ‍ॅपवर ‘जीआयएफ’ या प्रकारातील अ‍ॅनिमेशन्सयुक्त स्टीकर्स वापरता येत होते. यात व्हाटसअ‍ॅपच्या स्टीकर्स पॅकसह काही थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा यात समावेश होता. तर गेल्या आठवड्यातच व्हाटसअ‍ॅपवर अ‍ॅनिमेशन स्टीकर्सचा सपोर्ट येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर व्हाटसअ‍ॅपने अधिकृत घोषणा करून अँड्रॉइड व आयओएस प्रणालीच्या युजर्सला अ‍ॅनिमेशन स्टीकर्सची सुविधा उपलब्ध करत असल्याची माहिती दिली आहे. यानुसार हे फिचर तीन प्रकारातून युजर्सच्या उपयोगात पडणार आहे.

१) युजरला आता अ‍ॅनिमेटेड स्टीकर्स पाहता येणार आहेत. किंबहुना जे युजर स्टीकर्सला पाहू शकतात, ते याचा वापर देखील करू शकणार आहेत.

२) संबंधीत युजर हा त्रयस्थ म्हणजे थर्ड पार्टी वेबसाईट वा अ‍ॅपवरून अ‍ॅनिमेटेड स्टीकर्स आयात करून याचा वापर करू शकणार आहे.

३) तसेच संबंधीत युजर हा व्हाटसअ‍ॅपच्या स्टोअरवरून त्याला हवे असणार्‍या अ‍ॅनिमेशन स्टीकर्सच्या पॅकला डाऊनलोड करून याचा वापर देखील करू शकणार आहे.

व्हाटसअ‍ॅपवर अ‍ॅनिमेटेड स्टीकर्स कसे वापरणार ?

* खालील इमेजमध्ये दर्शविल्यानुसार व्हाटसअ‍ॅप चॅटवरील इमोजी आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खालील बाजूला स्टीकर्सचा ऑप्शन दिसेल. यावर आपल्याला टिचकी मारायची आहे.

* येथे आपल्याला + हा आयकॉन दिसेल यावर आपल्याला टिचकी मारायची आहे. (खालील इमेजमध्ये याला दर्शविलेले आहे.)

* यानंतर आपल्या समोर स्टीकर्स स्टोअर खुले होईल. येथे आपल्याला अनेक नवीन स्टीकर्स आढळून येतील. येथे आपल्याला ‘प्लेफुल प्लायोमारू’ या नावाने स्टीकर्सचा एक सेट दिसेल. यामध्ये चमी चम चम्स; रिकोज स्वीट लाईफ; ब्राईट डेज आणि मुडी फुडीज या अ‍ॅनिमेशन्सचा समावेश असून यापैकी आपणास हव्या असणार्‍याला डाऊनलोड करायचे आहे. एकदा का आपण याला डाऊनलोड केले की मग आपल्या स्टीकर्स लायब्ररीमध्ये आपल्याला हे अ‍ॅनिमेटेड स्टीकर्स दिसतील. अर्थात, आपण याचा सहजपणे वापर करू शकतो.

अ‍ॅनिमेशन स्टीकर्स वापरण्याआधी लक्षात घ्या :

व्हाटसअ‍ॅपवरील अ‍ॅनिमेटेड स्टीकर्सचे फिचर हे क्रमाक्रमाने सर्व युजर्सला उपलब्ध करण्यात येत आहे. हे आपल्याला उपलब्ध झाले की नाही ? हे पाहण्याआधी आधी आपली व्हाटसअ‍ॅपला अपडेट करून घ्या. तसेच हे अ‍ॅनिमेटेड स्टीकर्स व्हाटसअ‍ॅपवरील स्टीकर्सप्रमाणे लूप व्हिडीओ सारखे सातत्याने सुरू राहत नाहीत. ते एकदचा अ‍ॅनिमेट पध्दतीत ‘प्ले’ होतात. सध्या अ‍ॅनिमेशन्सचे चार सेट असले तरी लवकरच अन्य सेट देखील उपलब्ध होतील ही अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here