हुआमीचे अमेझफिट बीप लाईट स्मार्टवॉच दाखल

0

शाओमीची उपकंपनी असणार्‍या हुआमीने भारतीय ग्राहकांसाठी अमेझफिट बीप लाईट हे नवीन स्मार्टवॉच सादर केले आहे.

हुआमीने आधीच अमेझफिट ही मालिका भारतीय ग्राहकांना सादर केली आहे. यात आता अमेझफिट बीप लाईट या नवीन मॉडेलची भर पडली आहे. याचे मूल्य ३,९९९ रूपये असून ग्राहक याला अमेझॉन इंडियावरून १५ जुलैपासून खरेदी करू शकतील. यात १.२८ इंच आकारमानाचा, २.५डी या प्रकारातील आणि ऑल्वेज-ऑन या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. याच्या संरक्षणासाठी कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण देण्यात आलेले आहे. यात अ‍ॅक्सलेरोमीटर, बॅरोमीटर, जीपीएस आणि ग्लोनास आदी फिचर्स दिलेले आहेत. तर हे मॉडेल वॉटरप्रूफ असल्यामुळे स्वीमींग करतांनाही याचा वापर करता येणार आहे.

अमेझफिट बीप लाईट हे स्मार्टवॉच विविध प्रकारच्या फिचर्सचे सज्ज असून यात फिटनेस ट्रॅकरचे फंक्शन्सदेखील दिलेले आहेत. यात चाललेले अंतर, यातून वापरण्यात आलेल्या कॅलरीज आदी बाबींचे मापन करता येईल. यामध्ये हार्ट रेट मॉनिटरदेखील दिलेले असून यामुळे हृदयाच्या ठोक्यांचे मापन करता येणार आहे. यामध्ये अतिशय दर्जेदार बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ४५ दिवसांचा बॅकअप देणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. यासाठी अँड्रॉइड व आयओएस प्रणालीचे अ‍ॅप दिले असून याच्या मदतीने हे स्मार्टवॉच स्मार्टफोनला कनेक्ट करता येणार आहे. याचा लूक अतिशय आकर्षक असून यात बदलता येणारे विविध पट्टे ग्राहकांना मिळणार आहेत. तर वजनाने अतिशय हलके असल्यामुळे याचा सहजपणे वापर करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here