हुआमीचे अमेझफिट जीटीएस स्मार्टवॉच

0

हुआमी कंपनीने अमेझफिट जीटीएस हे स्मार्टवॉच भारतीय ग्राहकांना सादर केला असून याला अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

हुआमीने ऑगस्ट महिन्यात अमेझफिट जीटीएस या मॉडेलचे अनावरण केले होते. आता हे मॉडेल भारतीय ग्राहकांना ९,९९९ रूपये मूल्यात अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले आहे. यात १.६५ इंच चौरसाकृती आकाराचे आणि ३४८ बाय ४४२ इंच आकारमानाचा डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आलेले आहे. याला अ‍ॅल्युमिनियम अलॉयचे आवरण असून यासोबत सहा अतिशय आकर्षक रंगाचे पट्टे प्रदान करण्यात येणार आहेत. यात स्मार्टवॉचसह फिटनेस ट्रॅकरचे बहुतांश फिचर्स दिलेले आहेत. याला अ‍ॅपच्या मदतीने स्मार्टफोनशी कनेक्ट करता येणार आहे. यावर विविध नोटिफिकेशन्स पाहता येतील.

यासोबत हुआमी अमेझफिट जीटीएस या स्मार्टवॉचमध्ये विविध व्यायाम प्रकार आणि शारीरीक प्रक्रियावर नजर ठेवता येणार आहे. तसेच यात निद्रेचे मापन करण्याची सुविधादेखील दिलेली आहे. यात जीपीएसची सुविधाही आहे. यातील बॅटरी २२० मिलीअँपिअर क्षमतेची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ४६ दिवसांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here