हुआवेचा मीडियापॅड टी ५ टॅबलेट भारतात सादर

0

हुआवे कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी मीडियापॅड टी ५ हा टॅबलेट सादर केला असून याला अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

सध्या स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे टॅबलेटच्या खपावर विपरीत परिणाम झाला आहे. असे असले तरी भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत चांगल्या संख्येने टॅबलेटची विक्री होत असते. ही बाब लक्षात घेऊन हुआवेने मीडियापॅड टी ५ हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहे. याचे २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंट १४,९९० तर ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंट १६,९९० रूपयात अमेझॉन इंडियावरून उपलब्ध करण्यात आले आहे. हे दोन्ही व्हेरियंटस् १० जुलैपासून खरेदी करता येणार आहेत. यासोबत कंपनीने फ्लिप कव्हर आणि इयरफोन्स मोफत देण्याचे जाहीर केले आहे.

मीडियापॅड टी ५ या मॉडेलमध्ये १०.१ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजे १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. हा डिस्प्ले १६:१० असा अस्पेक्ट रेशोयुक्त असून याचे स्क्रीन-टू-बॉडी हे गुणोत्तर ७६.४ टक्के आहे. यात ऑक्टा-कोअर किरीन ६५९ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आलेला आहे. याच्या खालील बाजूस हुआवेच्या हिस्तेन या ध्वनी प्रणालीने सज्ज असणारे स्पीकर्स देण्यात आलेले आहेत. याच्या पुढील बाजूस कॅमेरा असला तरी याच्या क्षमतेबाबत माहिती दिलेली नाही. हा टॅबलेट अँड्राइड ८.० या आवृत्तीवर आधारित इएमयुआय ८.० या प्रणालीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here