पाच कॅमेर्‍यांनी युक्त हुआवे पी ३० व पी ३० प्रो स्मार्टफोन्सचे अनावरण

0

हुआवे कंपनीने पी ३० आणि पी ३० प्रो या दोन उच्च श्रेणीतील मॉडेल्सला बाजारपेठेत सादर केले असून यात एकूण पाच कॅमेरे देण्यात आले आहेत.

हुआवे कंपनीच्या पी २० आणि पी २० प्रो या स्मार्टफोन्सला अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला आहे. आता यांचीच पुढील आवृत्ती ही पी ३० आणि पी ३० प्रो या दोन मॉडेल्सच्या रूपात ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे कॅमेरे होता. या दोन्ही मॉडेल्समध्ये मागील बाजूस चार आणि समोर एक असे एकूण पाच कॅमेरे दिलेले आहेत. यातील पी ३० प्रो स्मार्टफोनच्या मागील बाजूच्या चार कॅमेर्‍यांमध्ये ४० मेगापिक्सल्सचा सुपरस्पेक्ट्रम प्राथमिक कॅमेरा आहे. याला २० मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड अँगल, ८ मेगापिक्सल्सचा टेलीफोटो लेन्स आणि एका टिओएफ (टाईम ऑफ फ्लाईट) कॅमेर्‍याची जोड देण्यात आलेली आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा तब्बल ३२ मेगापिक्सल्सचा असणार आहे. दरम्यान, हुआवे पी ३० या मॉडेलच्या मागील बाजूस ४० मेगापिक्सल्सचा प्रमुख कॅमेरा असून याला १६ मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड अँगल, ८ मेगापिक्सल्सचा टेलीफोटो लेन्स आणि एका टिओएफ (टाईम ऑफ फ्लाईट) कॅमेर्‍याची जोड देण्यात आलेली आहे. यातील फ्रंट कॅमेराही ३२ मेगापिक्सल्सचा असणार आहे.

हुआवे पी ३० मॉडेलमध्ये ६.१ इंच तर पी ३० प्लसमध्ये ६.७ इंच आकारमानाचे आणि फुल एचडी प्लस (२३४० बाय १०८० पिक्सल्स ) क्षमतांचे डिस्प्ले दिलेले आहेत. यांचा अस्पेक्ट रेशो १९:५:९ असून यावर ड्युड्रॉप या प्रकारातील नॉच देण्यात आलेला आहे. पी ३० या मॉडेलमध्ये ६ व ८ जीबी रॅमचे पर्याय असून स्टोअरेज १२८ जीबी आहे. तर पी ३० प्रो या मॉडेलमध्ये ८ जीबी रॅम असून स्टोअरेजसाठी १२८; २५६ आणि ५१२ जीबी असे पर्याय दिलेले आहेत. पी ३० मॉडेलमध्ये ३,६५० तर पी ३० प्रो मॉडेलमध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून फास्ट चार्जींगची सुविधा देण्यात आलेली आहे. हे दोन्ही उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्स लवकरच भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात येतील असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here