हुंदाईची ‘कनेक्टेड कार’ व्हेन्यू लाँच : जाणून घ्या सर्व फिचर्स !

0

हुंदाईचे बहुप्रतिक्षित व्हेन्यू हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले असून या कॉम्पॅक्ट एसयुव्हीमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत.

विविध पर्याय उपलब्ध

गेल्या अनेक दिवसांपासून हुंदाईच्या व्हेन्यू या मॉडेलबाबत औत्सुक्य निर्माण झाले होते. आता हे मॉडेल पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. याच्या विविध व्हेरियंटस्चे मूल्य ६.५५ लाखांपासून सुरू होणारे आहे. यात अनेक सरस फिचर्स असून यातील सर्वात लक्षवेधी सुविधा ही खास करून तरूणाईला समोर ठेवून प्रदान करण्यात आली आहे. हुंदाईने याला ‘कनेक्टेड कार’ असे म्हटले आहे.

कनेक्टेड कार

हुंदाई व्हेन्यू ही देशातील पहिली ‘कनेक्टेड कार’ असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात हुंदाईच्या ब्ल्यू लिंक या प्रणालीवर आधारित तब्बल ३३ नवीन फिचर्स देण्यात आलेले आहेत. ही प्रणाली साऊंड हाऊंड या कृत्रीम बुध्दीमत्तेवर आधारित व्हाईस कमांडमधील ख्यातप्राप्त असणार्‍या कंपनीने विकसित केली असून यात आयडिया-व्होडाफोन कंपनीचे ई-सीमकार्ड असणार आहे. यामध्ये लोकेशन बेस्ड सेवांसह रिअल टाईम ट्रॅकींग, भौगोलिक माहिती, अलर्टस् आदींची सुविधा मिळणार आहे. स्मार्टफोन अ‍ॅपच्या मदतीने यातील विविध फंक्शन्सचा वापर करता येणार आहे. यात दुरवरून कार सुरू/बंद करणे; दरवाजे लॉक/अनलॉक करणे; कार लोकेशन शेअरींग, वायरलेस चार्जर आदींसह अन्य सुविधा मिळतील. याशिवाय यामध्ये कारच्या विविध स्पेअर पार्टस्ची स्थिती, सर्व्हीसिंगचे नियोजन आदी बाबींचे अलर्टही मिळतील. ब्ल्यू लिंक या प्रणालीसाठी कंपनी आकारणी करणार आहे. तथापि, ग्राहकाला तीन वर्षांसाठी ही सेवा मोफत देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर याच्या डॅशबोर्डवर अतिशय दर्जेदार इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळणार असून यात नेव्हेगेशन व अन्य फिचर्ससह स्मार्टफोनला कनेक्ट करण्याची सुविधा मिळेल.

असे आहेत व्हेरियंटस्

हुंदाईच्या व्हेन्यू या मॉडेलमध्ये १.४ लीटर क्षमतेचे पेट्रोल कप्पा टी-जीडीआय पेट्रोल इंजिन दिले असून यात ६ स्पीड मॅन्युअल गिअर्स असतील. हे मॉडेल प्रति लिटर १८.२७ किलोमीटर इतके मायलेज देणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर यातीलच ७-स्पीड डिसीटी अ‍ॅटोमॅटीक व्हेरियंटचा अ‍ॅव्हरेज १८.२५ किलोमीटर प्रति-लिटर असेल. याच प्रकारातील १.२ लीटर क्षमतेचे पेट्रोल व्हेरियंट हे १७.५२ किलोमीटर प्रति-लिटर इतका अ‍ॅव्हरेज देणार आहे. तर यात १.४ लीटर क्षमतेची सीआरडीआय डिझेल इंजिनाचा पर्याय दिलेला आहे. याच्या सर्व व्हेरियंटमध्ये मॅन्युअल गिअर्सची सुविधा आहे. याचे मायलेज २३.२४ किलोमीटर प्रति-लिटर मिळणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

अन्य फिचर्स

हुंदाईच्या व्हेन्यू या मॉडेलचा लूक अतिशय आकर्षक असून यात स्टाईल, कंफर्ट आणि सुरक्षा या तिन्ही बाबींचा समुच्चय करण्यात आलेला आहे. यात सुरक्षाविषयक फिचर्समध्ये ड्युअल एयरबॅग्ज (उच्च श्रेणीत एकूण सहा एयरबॅग्ज ) , इबीडी प्रणालीसह एबीएस सिस्टीम, रिव्हर्स पार्कींग सेन्सर, सिटबेल्ट रिमाइंडर, ऑटो डोअर आणि ऑटो डोअर अनलॉक प्रणाली आदींचा समावेश आहे. तर अन्य फिचर्समध्ये डायमंड कट अलॉय व्हील्स, स्मार्ट इलेक्ट्रीक सनरूफ, क्रूझ कंट्रोल, एसी व्हेंटस्, डिजीटल डिस्प्ले आदींचा समावेश आहे.

पहा : हुंदाई व्हेन्यू मॉडेलची माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here