इन्फीनिक्सचा ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांनी युक्त किफायतशीर स्मार्टफोन

0

इन्फीनिक्स कंपनीने ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांनी युक्त असणारा स्मार्ट ३ प्लस हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी अत्यंत किफायतशीर दरात सादर केला आहे.

सध्या बर्‍याच कंपन्या तीन रिअर कॅमेर्‍यांचा सेटअप असणारे मॉडेल्स सादर करत आहेत. तथापि, हे स्मार्टफोन्स तुलनेत महाग आहेत. तथापि, इन्फीनिक्स स्मार्ट ३ प्लस हे मॉडेल फक्त ६,९९९ रूपयात सादर करण्यात आले आहे. हे मॉडेल ३० एप्रिलपासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवर खरेदी करता येणार आहे. अर्थात, हा सर्वात स्वस्त ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांनी युक्त असणारा स्मार्टफोन ठरला आहे. याच्या मागील बाजूस तीन कॅमेरे असून यामध्ये १३, २ आणि लो लाईट सेन्सरचा समावेश आहे. या तिन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा घेता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये पीडीएएफ, ऑटो सीन डिटेक्शन, ड्युअल एलईडी फ्लॅश, एआर स्टीकर्स आदी फिचर्सचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिला असून यात ब्युटी मोड या फिचरचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, इन्फीनिक्स स्मार्ट ३ प्लस या मॉडेलमध्ये ६.२१ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी डिस्प्ले दिलेला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १९:५:९ असा आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय आवृत्तीवर आधारित असणार्‍या एक्सओएस ५.० या प्रणालीवर चालणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here