इन्स्टाग्रामवर येणार डार्क मोड

0

इन्स्टाग्राम अ‍ॅपला आता डार्क मोडचा सपोर्ट देण्यात येत असून अँड्रॉइड व आयओएस युजर्स याचा लवकरच वापर करू शकतील.

अलीकडच्या काळात बहुतांश अ‍ॅप्सवर डार्क मोड देण्यात आलेला आहे. यात प्रामुख्याने ट्विटर, जीमेल आदींचा समावेश आहे. तर व्हाटसअ‍ॅपवर हे फिचर लवकरच देण्यात येणार आहे. डार्क मोडमुळे डोळ्यांवर ताण येत नसल्यामुळे ही सुविधा युजर्ससाठी लाभदायक असल्याचे आधीच सिध्द झाले आहे. विशेष करून रात्री उशीरापर्यंत स्मार्टफोन वापरणार्‍यांना हे फिचर उपयुक्त आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंप अ‍ॅपवरदेखील डार्क मोड येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. इन्स्टाग्रामचे वरिष्ठ अधिकारी अ‍ॅडम मोसेरी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. यात त्यांनी आयओएस १३ आणि अँड्रॉइड १० या प्रणालींच्या युजर्ससाठी लवकरच डार्क मोड देण्यात येणार असल्याचे घोषीत केले आहे. यात त्यांनी युजर्सला हे फिचर नेमके केव्हा मिळेल याबाबत माहिती दिलेली नसली तरी अपडेटच्या स्वरूपात याला सादर करण्यात येणार असल्याचे समजते. पहिल्या टप्प्यात अँड्रॉइड व आयओएस प्रणालीच्या ताज्या आवृत्त्यांसाठी ही सुविधा सादर करण्यात येणार असून नंतर क्रमाक्रमाने अन्य युजर्सदेखील याचा वापर करू शकतील.

दरम्यान, यासोबत इन्स्टाग्रामने आपल्या अ‍ॅपमधील फॉलोविंग टॅब काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आधी या फिचरमुळे आपण फॉलो करत असलेल्या अकाऊंटधारकाच्या प्रत्येक घडामोडीला ट्रॅक करता येत होते. तथापि, बर्‍याच युजर्सला ही सुविधा त्रासदायक वाटत होती. यामुळे आता हा भागच काढून टाकण्यात येणार आहे. तर गत सप्ताहात इन्स्टाग्रामने रेस्ट्रीक्ट हे फिचरदेखील युजर्सला सादर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here