इन्स्टाग्रामवर क्विझ स्टीकर्स फिचर : जाणून घ्या कसा कराल वापर ?

0

इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी क्विझ स्टीकर्स हे नवे फिचर सादर केले असून याच्या माध्यमातून बहुपर्यायी प्रश्‍न विचारण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

इन्स्टाग्रामवर आधीच पोलींगचे फिचर देण्यात आले आहे. आता याला स्टोरीजशी संलग्न करून क्विझ स्टीकर्स हे नवीन फिचर प्रदान करण्यात आले आहे. नावातच नमूद असल्यानुसार हे प्रश्‍न मंजुषेशी संबंधीत फिचर आहे. यातील लक्षवेधी बाब म्हणजे युजर कोणताही प्रश्‍न विचारून यासाठी बहुपर्यायी उत्तर सुचवू शकणार आहे. एका प्रश्‍नाला चार उत्तरे सुचविण्याची सुविधा यामध्ये प्रदान करण्यात आली आहे. हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून इन्स्टाग्रामने आपल्या युजर्सला स्टोरीज हे फिचर अधिक मनोरंजक पध्दतीने वापरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे मानले जात आहे.

कसे वापराल ?

* इन्स्टाग्राम क्विझ स्टीकर्स या फिचरचा वापर करण्यासाठी युजरला स्टोरीज अपलोड करण्याच्या विभागात जावे लागेल. येथे संबंधीत क्विझची पार्श्‍वभूमि म्हणून वापरण्यासाठी इमेज निवडण्याची सुविधा आहे. युजर आपण आधी अपलोड केलेली प्रतिमा अथवा आपल्या गॅलरीतील छायाचित्राचा यासाठी वापर करू शकतो.

* यानंतर स्क्रीनच्या वरील भागात असणार्‍या स्टीकर ट्रे या भागावर क्लिक करावे. यातील क्विझ स्टीकरवर क्लिक केल्यावर याचे टेंपलेट ओपन होईल. यामध्ये युजर त्याला हवा असणारा प्रश्‍न आणि याच्या उत्तरासाठीचे चार पर्याय टाईप करू शकतो. येथे युजरला क्विझ स्टीकर्सचा रंग बदलण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.

* एकदा का हे सर्व झाले की मग डन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर संबंधीत क्विझ ही अन्य युजर्सला दिसू लागले.

क्विझ स्टीकर्सच्या वापराबाबत इन्स्टाग्रामने आपल्या खालील ट्विटमध्ये व्हिडीओ दिलेला आहे. तो आपण पाहू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here