गुगल असिस्टंटवर ‘रिअल टाईम’ भाषांतराची सुविधा

0

स्मार्टफोनमधील गुगल असिस्टंटवर आता इंटरप्रिटर मोड प्रदान करण्यात आला असून यामुळे युजर्सला अगदी रिअल टाईम भाषांतराची सुविधा मिळणार आहे.

गुगलने या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या सीईएस या एक्सपोमध्ये पहिल्यांदा इंटरप्रिटर मोड प्रदर्शीत केला होता. यानंतर याला निवडक स्मार्ट स्पीकरसाठी सादर करण्यात आले होते. आता हेच फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालीच्या युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. याबाबत गुगलने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. यानुसार अनुवादाची ही सुविधा टेक्स्ट आणि व्हॉईस या दोन्ही प्रकारांसाठी उपलब्ध असेल. अर्थात, यासाठी आधी गुगल असिस्टंटला हे गुगल असिस्टंट बिकम माय (भाषेचे नाव) इंटरप्रीटर वा (भाषेचे नाव) इंटरप्रीटर अशी कमांड द्यावी लागेल. यानंतर आपण एका भाषेतून बोलले वा लिहल्यास ते आपण सिलेक्ट केलेल्या भाषेत ऐकता वा पाहता येईल. हे भाषांतर अगदी रिअल टाईम होणार असल्याचे युजर्सला ते अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर स्टॉप, क्विट वा एक्झीट म्हटल्यानंतर हा मोड बंद होणार आहे.

गुगल असिस्टंटच्या या इंटरप्रिटर मोडमध्ये जगातील ४४ भाषांचा समावेश करण्यात आला असून यात मराठी व हिंदीसह अन्य महत्वाच्या भाषांचा समावेश आहे. याचा वापर करण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये गुगल असिस्टंट हे अ‍ॅप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. हे अ‍ॅप आधीच इन्स्टॉल केलेले असल्यास याला गुगल प्ले स्टोअरवरून अपडेट करून घ्यावे. यानंतर आपण ४४ भाषांमध्ये अनुवादाचा लाभ मिळवू शकतो.

खालील अ‍ॅनिमेशनमध्ये रिअल टाईम भाषांतराचे फिचर नेमके कसे कार्य करणार याची माहिती दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here