व्हाटसअ‍ॅपवरील फॉरवर्डेड मॅसेज सुरक्षित आहे का ? : ‘अशी’ करा तपासणी !

0

व्हाटसअ‍ॅपने आता आपल्या युजर्ससाठी कोणताही फॉरवर्डेड मॅसेज हा सुरक्षित आहे की नाही ? याला ओळखण्यासाठी एक नवीन चिन्ह प्रदान केले आहे.

व्हाटसअ‍ॅपने फॉरवर्डेड मॅसेजबाबत अतिशय कठोर धोरण स्वीकारले आहे. बहुतांश फेक कंटेंट हे फॉरर्ड केल्या जाणार्‍या संदेशांमधूनच होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने फास्ट फॉरवर्ड या प्रकारात एका वेळी फक्त पाच ठिकाणी मॅसेज फॉरवर्ड करणे शक्य आहे. अलीकडच्या काळात एक प्रयोगात्मक फिचरच्या माध्यमातून एखादा संदेश किती वेळेस फॉरवर्ड केलेला आहे याची अचूक माहिती ही काऊंटरच्या माध्यमातून मिळण्याची चाचपणीदेखील केली जात आहे. तर याआधीच फॉरवर्डेड मॅसेजमधील लिंकमध्ये मालवेअर असल्यास याची माहिती मिळण्याची सुविधादेखील दिलेली आहे.

दरम्यान, फॉरवर्डेड मॅसेजला अजून सुरक्षा प्रदान करण्यासाठी व्हाटसअ‍ॅपने नवीन सुविधा दिली असून याबाबत आपल्या एफएक्यू म्हणजेच फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्‍चन्स या विभागात माहिती दिली आहे. यानुसार आजवर जास्त वेळेस फॉरवर्ड करण्यात आलेल्या मॅसेजवर आधीच एका अ‍ॅरोच्या माध्यामतून ( ) माहिती दिलेली असते. आता संबंधीत मॅसेज हा एंड-टू-एंड एनक्रिप्शनने सुरक्षित असल्यास डबल अ‍ॅरो ( ) या चिन्हाच्या माध्यमातून दर्शविण्यात येणार आहे. म्हणजेच सुरक्षित फॉरवर्डे मॅसेज हा डबल अ‍ॅरोच्या माध्यमातून ओळखता येणार आहे.

जगभरातील युजर्सला डबल अ‍ॅरोच्या माध्यमातून सुरक्षित मॅसेज ओळखण्याची सुविधा क्रमाक्रमाने देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे फिचर पहिल्यांदा आयओएस तर नंतर अँड्रॉइड युजर्सला मिळणार असल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here