आयटेलचा किफायतशीर ए ४६ स्मार्टफोन

0

आयटेल कंपनीने भारतीय बाजारपेठेत ए ४६ हा स्मार्टफोन लाँच केला असून या एंट्री लेव्हलच्या मॉडेलमध्ये अनेक उत्तम फिचर्स आहेत.

ट्रान्ससिऑन होल्डींगची मालकी असणार्‍या आयटेल कंपनीने सातत्याने किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्सयुक्त मॉडेल सादर करण्यास प्राधान्य दिले आहे. ए४६ हे मॉडेलदेखील याच प्रकारातील आहे. याचे मूल्य ४,९९९ रूपये असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या स्मार्टफोनला कंपनीने १० दिवसांसाठी रिप्लेसमेंट वॉरंटी दिलेली आहे. तर यासोबत जिओने १२०० रूपयांच्या कॅशबॅकसह ५० जीबी फोर-जी डाटा देण्याचेही जाहीर केले आहे.

आयटेल ए४६ या मॉडेलमध्ये ५.४५ इंच आकारमानाचा एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा व १८:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा आयपीएस डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर दिला असला तरी याच्या नावाची माहिती दिलेली नाही. याची रॅम दोन जीबी व इनबिल्ट स्टोअरे १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यात ८ मेगापिक्सल्स आणि व्हीजीए क्षमतेच्या दोन कॅमेर्‍यांचा समावेश आहे. याच्या मदतीने दर्जेदार प्रतिमा घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आलेला आहे. यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here