जिओच्या ‘या’ प्लॅन्ससोबत मिळणार टिव्ही !

0

रिलायन्स जिओने आपल्या निवडक प्लॅन्ससोबत एचडी अथवा फोर-के क्षमतेच्या टिव्हीला मोफत देण्याचे जाहीर केले असून याबाबतची ही माहिती.

रिलायन्सच्या जिओ फायबर सेवेला वेलकम ऑफर या नावाने ५ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे लाँच करण्यात आले. यात ब्राँझ ते टिटॅनियम या नावांनी एकूण सहा प्लॅन सादर करण्यात आले. यातील चार प्लॅनवर ग्राहकांना एचडी अथवा फोर-के क्षमतेचा टिव्ही मोफत देण्यात येणार आहेत. अर्थात, यासाठी काही अटी लावण्यात आलेल्या आहेत.

१) जिओ फायबरच्या टिटॅनियम प्लॅनसोबत फोर-के क्षमतेचा, ४३ इंच आकारमानाचा व ४४,९९० रूपये मूल्याचा टिव्ही मोफत दिला जाणार आहे. अर्थात, यासाठी या प्लॅनचे वार्षिक मूल्य (याचा मासिक दर ८४९९ रूपये आहे.) १०१९८८ रूपये एकाच वेळेस भरावे लागणार आहे. या योजनेत १ जीबीपीएस इतक्या प्रचंड वेगाने ६० हजार जीबी इतका डाटा वापरता येणार आहे.

२) जिओ फायबरच्या प्लॅटिनम प्लॅनसोबत एचडी क्षमतेचा, ३२ इंच आकारमानाचा व २२,९९० रूपये मूल्याचा टिव्ही मोफत दिला जाणार आहे. अर्थात, यासाठी या प्लॅनचे वार्षिक मूल्य (याचा मासिक दर ३९९९ रूपये आहे.) ४७,९८८ रूपये एकाच वेळेस भरावे लागणार आहे. या योजनेत १ जीबीपीएस इतक्या प्रचंड वेगाने ३० हजार जीबी इतका डाटा वापरता येणार आहे.

३) जिओ फायबरच्या डायमंड प्लॅनसोबत एचडी क्षमतेचा, २४ इंच आकारमानाचा व १२,९९० रूपये मूल्याचा टिव्ही मोफत दिला जाणार आहे. अर्थात, यासाठी या प्लॅनचे वार्षिक मूल्य (याचा मासिक दर २४९९ रूपये आहे.) २९,९९८ रूपये एकाच वेळेस भरावे लागणार आहे. या योजनेत ५०० एमबीपीएस या वेगाने १५ हजार जीबी इतका डाटा वापरता येणार आहे.

४) जिओ फायबरच्या गोल्ड प्लॅनसोबत एचडी क्षमतेचा, २४ इंच आकारमानाचा व १२,९९० रूपये मूल्याचा टिव्ही मोफत दिला जाणार आहे. अर्थात, यासाठी या प्लॅनचे द्विर्षिक मूल्य (याचा मासिक दर १२९९ रूपये आहे.) ३१,१७६ रूपये एकाच वेळेस भरावे लागणार आहे. या योजनेत २५० एमबीपीएस या वेगाने १२ हजार जीबी इतका डाटा वापरता येणार आहे.

दरम्यान, जिओ फायबरच्या ब्राँझ आणि गोल्ड या दोन प्राथमिक प्लॅन्ससोबत कंपनीने ब्ल्यु-टुथ स्पीकर मोफत देण्याची घोषणादेखील केली आहे. कुणीही रिलायन्स जिओ संकेतस्थळावर अथवा अ‍ॅपवर जाऊन जिओफायबर सेवेची नोंदणी करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here