जिओ फायबर सेवा लाँच : जाणून घ्या सर्व प्लॅन्स

1

रिलायन्सची बहुप्रतिक्षित जिओ फायबर ही सेवा आज अधिकृतपणे लाँच करण्यात आली असून याचे विविध प्लॅन्स जाहीर करण्यात आले आहेत. या सर्वांची माहिती खास आपल्यासाठी.

रिलायन्सने गत वर्षी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओ फायबर या सेवेची घोषणा केली होती. ही फायबर-टू-द-होम म्हणजेच एफटीटीएच या प्रकारातील सेवा असून या माध्यमातून अति गतीमान ब्रॉडबँड इंटरनेटसह अन्य सेवा प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. यानंतर जिओ फायबर या सेवेला प्रयोगात्मक अवस्थेत सादर करण्यात आले होते. याची अनेक शहरांमध्ये चाचणी घेण्यात आली होती. यानंतर गत महिन्यात झालेल्या रिलायन्सच्या वार्षिक सभेत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ही सेवा लाँच केली होती. तेव्हाच जिओ फायबर सेवेला ५ सप्टेंबरपासून अधिकृतपणे सुरू केले जाईल असे सांगण्यात आले होते. यानुसार आज या सेवेचे अधिकृतपणे आगमन झाले आहे. सायंकाळी सहा वाजता जिओ अ‍ॅपवर याचे विविध प्लॅन्स सादर करण्यात आले आहेत. याच्या अंतर्गत खालीलप्रमाणे प्लॅन्स आहेत.

जिओफायबरचा बेसिक प्लॅन ब्राँझ या नावाने लाँच करण्यात आला असून याच्या अंतर्गत युजरला महिनाभरापर्यंत १०० एमबीपीएस या वेगाने अमर्याद इंटरनेट वापरता येणार आहे. यात युजर देशभरात कुठेही मोफत व्हॉईस कॉल करू शकणार आहे. (यात युजरला १००+५० जीबी प्रत्यक्षात वापरता येईल.) सिल्व्हर प्लॅन ८४९ रूपये महिना इतक्या रूपयात मिळणार आहे. यातदेखील १०० एमबीपीएस वेगाने इंटरनेट आणि मोफत व्हाईस कॉलींग करता येणार आहे.(यात युजरला २००+२०० जीबी प्रत्यक्षात वापरता येईल.) गोल्ड प्लॅन १२४९ रूपयात मिळणार आहे. यात ग्राहकाला २५० एमबीपीएस वेगाने इंटरनेट वापरता येणार आहे. (यात युजरला ५००+२५० जीबी प्रत्यक्षात वापरता येईल.) डायमंड प्लॅन २४९९ रूपयांचा असून यात तब्बल ५०० एमबीपीएस वेग मिळणार आहे. (यात युजरला १२५०+२५० जीबी प्रत्यक्षात वापरता येईल.) प्लॅटीनम प्लॅन ३,९९९ रूपये मूल्यात येणार असून यात १ जीबीपीएसचा वेग मिळेल. (यात युजरला २५०० जीबी प्रत्यक्षात वापरता येईल.) तर टिटॅनियम हा प्लॅन ८,४९९ रूपयात येणार असून यातही १ जीबीपीएसचा वेग मिळेल. (यात युजरला ५००० जीबी प्रत्यक्षात वापरता येईल.)

प्लॅनचे विस्तृत विवरण

१) ब्राँझ प्लॅन ( दरमहा ६९९ रूपये ) : या प्लॅनमध्ये महिनाभरासाठी १०० मेगाबाईट प्रति सेकंद इतक्या गतीने इंटरनेट वापरता येईल. यात ग्राहक १५० जीबी डाटा वापरू शकतो. यासोबत त्याला अमर्याद कॉल करता येतील. यासोबत त्याला टिव्ही व्हिडीओ कॉलींग/ कॉन्फरन्सींग करता येईल. याचे मूल्य प्रति वर्ष १२०० रूपये इतके आहे. यासोबत ग्राहकाला २००० रूपये प्रति-वर्ष इतक्या रकमेच्या गेमींगचा लाभ मिळेल. होम नेटवर्कींग आणि शेअरींगची सुविधाही यात मिळणार आहे. तर दर वर्षी ९९९ रूपये इतक्या रकमेची डिव्हाईस सिक्युरिटीही यात मिळणार आहे.

२) सिल्व्हर प्लॅन ( दरमहा ८४९ रूपये : या प्लॅनमध्ये महिनाभरासाठी १०० मेगाबाईट प्रति सेकंद इतक्या गतीने इंटरनेट वापरता येईल. यात ग्राहक ४०० जीबी डाटा वापरू शकतो. यासोबत त्याला अमर्याद कॉल करता येतील. यासोबत त्याला टिव्ही व्हिडीओ कॉलींग/ कॉन्फरन्सींग करता येईल. याचे मूल्य प्रति वर्ष १२०० रूपये इतके आहे. यासोबत ग्राहकाला २००० रूपये प्रति-वर्ष इतक्या रकमेच्या गेमींगचा लाभ मिळेल. होम नेटवर्कींग आणि शेअरींगची सुविधाही यात मिळणार आहे. तर दर वर्षी ९९९ रूपये इतक्या रकमेची डिव्हाईस सिक्युरिटीही यात मिळणार आहे.

३) गोल्ड प्लॅन ( दरमहा १२९९ रूपये : या प्लॅनमध्ये महिनाभरासाठी २५० मेगाबाईट प्रति सेकंद इतक्या गतीने इंटरनेट वापरता येईल. यात ग्राहक ७५० जीबी डाटा वापरू शकतो. यासोबत त्याला अमर्याद कॉल करता येतील. यासोबत त्याला टिव्ही व्हिडीओ कॉलींग/ कॉन्फरन्सींग करता येईल. याचे मूल्य प्रति वर्ष १२०० रूपये इतके आहे. यासोबत ग्राहकाला २००० रूपये प्रति-वर्ष इतक्या रकमेच्या गेमींगचा लाभ मिळेल. होम नेटवर्कींग आणि शेअरींगची सुविधाही यात मिळणार आहे. तर दर वर्षी ९९९ रूपये इतक्या रकमेची डिव्हाईस सिक्युरिटीही यात मिळणार आहे.

४) डायमंड प्लॅन ( दरमहा २४९९ रूपये : या प्लॅनमध्ये महिनाभरासाठी ५०० मेगाबाईट प्रति सेकंद इतक्या गतीने इंटरनेट वापरता येईल. यात ग्राहक १५०० जीबी डाटा वापरू शकतो. यासोबत त्याला अमर्याद कॉल करता येतील. यासोबत त्याला टिव्ही व्हिडीओ कॉलींग/ कॉन्फरन्सींग करता येईल. याचे मूल्य प्रति वर्ष १२०० रूपये इतके आहे. यासोबत ग्राहकाला २००० रूपये प्रति-वर्ष इतक्या रकमेच्या गेमींगचा लाभ मिळेल. होम नेटवर्कींग आणि शेअरींगची सुविधाही यात मिळणार आहे. तर दर वर्षी ९९९ रूपये इतक्या रकमेची डिव्हाईस सिक्युरिटीही यात मिळणार आहे. यात ग्राहकाला व्हिआर हेडसेटच्या मदतीने व्हिआर अर्थात व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीची अनुभूती घेता येणार आहे. यासोबत ग्राहकाला प्रिमीयम कंटेंटचाही लाभ मिळणार असून यात फर्स्ट डे फर्स्ट शो तसेच अन्य स्पोर्टस सुविधांचा लाभ असणार आहे.

५) प्लॅटीनम प्लॅन ( दरमहा ३९९९ रूपये : या प्लॅनमध्ये महिनाभरासाठी १ जीबी प्रति सेकंद इतक्या गतीने इंटरनेट वापरता येईल. यात ग्राहक २५०० जीबी डाटा वापरू शकतो. यासोबत त्याला अमर्याद कॉल करता येतील. यासोबत त्याला टिव्ही व्हिडीओ कॉलींग/ कॉन्फरन्सींग करता येईल. याचे मूल्य प्रति वर्ष १२०० रूपये इतके आहे. यासोबत ग्राहकाला २००० रूपये प्रति-वर्ष इतक्या रकमेच्या गेमींगचा लाभ मिळेल. होम नेटवर्कींग आणि शेअरींगची सुविधाही यात मिळणार आहे. तर दर वर्षी ९९९ रूपये इतक्या रकमेची डिव्हाईस सिक्युरिटीही यात मिळणार आहे. यात ग्राहकाला व्हिआर हेडसेटच्या मदतीने व्हिआर अर्थात व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीची अनुभूती घेता येणार आहे. यासोबत ग्राहकाला प्रिमीयम कंटेंटचाही लाभ मिळणार असून यात फर्स्ट डे फर्स्ट शो तसेच अन्य स्पोर्टस सुविधांचा लाभ असणार आहे.

६) टिटॅनियम प्लॅन ( दरमहा ८४९९ रूपये ) : या प्लॅनमध्ये महिनाभरासाठी १ जीबी प्रति सेकंद इतक्या गतीने इंटरनेट वापरता येईल. यात ग्राहक ५००० जीबी डाटा वापरू शकतो. यासोबत त्याला अमर्याद कॉल करता येतील. यासोबत त्याला टिव्ही व्हिडीओ कॉलींग/ कॉन्फरन्सींग करता येईल. याचे मूल्य प्रति वर्ष १२०० रूपये इतके आहे. यासोबत ग्राहकाला २००० रूपये प्रति-वर्ष इतक्या रकमेच्या गेमींगचा लाभ मिळेल. होम नेटवर्कींग आणि शेअरींगची सुविधाही यात मिळणार आहे. तर दर वर्षी ९९९ रूपये इतक्या रकमेची डिव्हाईस सिक्युरिटीही यात मिळणार आहे. यात ग्राहकाला व्हिआर हेडसेटच्या मदतीने व्हिआर अर्थात व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीची अनुभूती घेता येणार आहे. यासोबत ग्राहकाला प्रिमीयम कंटेंटचाही लाभ मिळणार असून यात फर्स्ट डे फर्स्ट शो तसेच अन्य स्पोर्टस सुविधांचा लाभ असणार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here