जिओ गिगा फायबर सेवा सर्वांसाठी होणार खुली

0

रिलायन्सच्या जिओने आपली गिगा फायबर ही सेवा ५ सप्टेंबरपासून सर्वांसाठी खुली करण्याची घोषणा आज करण्यात आली.

रिलायन्स जिओतर्फे गेल्या वर्षी ५ जुलै रोजी झालेल्या वार्षिक बैठकीत गिगाफायबर या सेवेची घोषणा करण्यात आली होती. ही एफटीटीएच म्हणजेच फायबर-टू-द-होम या प्रकारातील सेवा असून याच्या अंतर्गत युजरला अतिशय गतीमान असे ब्रॉडबँड वापरण्याची सुविधा प्रदान करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ही सेवा काही महिन्यांमध्येच सुरू होणार असल्याची घोषणादेखील करण्यात आली होती. यासाठी नोंदणीदेखील सुरू करण्यात आली होती. तथापि, गत वर्षभरात चाचणीच्या पलीकडे ही सेवा कधी सुरू होणार याबाबत काहीही भाष्य करण्यात आले नव्हते. यानंतर या वर्षी एप्रिल महिन्यात गिगाफायबरची चाचणी पूर्ण झाली असून याला एकाच वेळी देशातील १६०० शहरांमध्ये लाँच करण्यात येणार असल्याची घोषणादेखील करण्यात आली. तथापि, अद्याप तरी ही सेवा सर्वांसाठी खुली करण्यात आलेली नाही. या पार्श्‍वभूमिवर, रिलायन्सच्या आजच्या बैठकीत गिगा फायबरबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.

यानुसार आता ५ सप्टेंबर २०१९ पासून गिगा फायबरची सेवा सर्वांसाठी खुली करण्यात येणार आहे. यासाठी १०० एमबीपीएस ते १ जीबीपीएस या स्पीडचे विविध प्लॅन्स सादर करण्यात येणार आहेत. हे प्लॅन्स ७०० रूपये ते १० हजार रूपये प्रति महिना इतक्या दरांचे असतील अशी घोषणा रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली. या प्लॅन्सच्या अंतर्गत युजरला एक स्वतंत्र लँडलाईन क्रमांक मिळणार असून यासाठी कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त आकारणीची भुर्दंड पडणार नाही. तर ग्राहकाला फक्त डाटा खरेदी करण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. यासोबत फोर-के व एचडी क्षमतेचा सेट टॉप बॉक्सदेखील प्रदान करण्यात येणार आहे. या सेट टॉप बॉक्सच्या मदतीने युजर आपल्या स्मार्टफोनवर इंटरनेटवरील कंटेंट पाहू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here