जिओ गिगा फायबरची चाचणी पूर्ण; १६०० शहरांमध्ये होणार लाँच

0
जिओ गिगाफायबर, गिगाफायबर, jio gigafiber

रिलायन्सच्या जिओ गिगा फायबर सेवेची चाचणी पूर्ण झाली असून याला देशातील १६०० शहरांमध्ये एकाच वेळेस सादर करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

रिलायन्सने गिगा फायबर या नावाने ऑप्टीकल फायबरच्या माध्यमातून ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याची घोषणा गत जुलै महिन्याच्या प्रारंभी केली होती. यानंतर सप्टेबर महिन्यापासून याला टप्प्याटप्प्याने प्रायोगिक अवस्थेत सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून ते आजवर गिगा फायबर सेवेची चाचणी सुरू आहे. यामुळे आता ही सेवा नेमकी केव्हा सुरू होणार याबाबत औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाली आहे. यातच येत्या काही दिवसांमध्ये ही सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. गिगा फायबर ही सेवा एकाच वेळी देशातील तब्बल १६०० शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असून जिओने यासाठी आवश्यक ती तयारी केल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे.

रिलायन्स गिगा फायबर सेवा ही विविध प्लॅन्सच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. यात ग्राहकांना सुमारे १०० मेगाबाईट प्रति सेकंद इतक्या जलद गतीने ब्रॉडबँड इंटरनेटचा वापर शक्य होणार आहे. रिलायन्सने अलीकडेच हॅथवे आणि डेन केबल नेटवर्क या ख्यातप्राप्त कंपन्यांमधील हिस्सेदारी खरेदी केली आहे. या माध्यमातून देशाच्या अगदी कान्याकोपर्‍यात आपली गिगा फायबर ही फायबर टू होम सेवा पोहचवण्यासाठी ही कंपनी सज्ज झाल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here