जिओ ग्लासची एंट्री : रिलायन्सची थ्रीडी व्हर्च्युअल क्लासरूम

0

रिलायन्सच्या जिओने मिक्स्ड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानावर आधारित असणारे जिओ ग्लास हे स्मार्ट ग्लास बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

रिलायन्सची आज ४३ वी सर्वसाधारण बैठक व्हर्च्युअल या प्रकारात आयोजित करण्यात आली. यात कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केला. यात जिओ ग्लास हे नवीन उपकरण बाजारपेठेत सादर करण्यात येणार असल्याची घोषणा लक्षवेधी ठरली. जिओ ग्लास हा संमीश्र सत्यता म्हणजेच मिक्स्ड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात वास्तव आणि आभास याचा बेमालूम मिलाफ करण्यात आलेला आहे.

जिओ ग्लास हे फक्त ७५ ग्रॅम वजनाचे आहेत. याच्या मदतीने कुणीही त्रिमीती म्हणजेच थ्रीडी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण नसणार्‍या ठिकाणी असल्याची अनुभूती घेऊ शकतो. याच्या सोबत एक वायर देण्यात आली असून याच्या मदतीने या गॉगलला स्मार्टफोन अटॅच करता येतो. सध्या जिओ ग्लासवर २५ अ‍ॅप्सचा सपोर्ट दिलेला असला तरी ही संख्या लवकरच वाढविण्यात येणार आहे. याच्या मदतीने थ्रीडी तसेच होलोग्राफीक तंत्रज्ञानांवर आधारित सेवांचा वापर करता येणार आहे. याचा सर्वात जास्त वापर हा शिक्षण क्षेत्रात होऊ शकतो. सध्या कोरोनाच्या आपत्तीमुळे लॉकडाऊन सुरू असून बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करावा लागत आहे. यासाठी झूमसह अन्य अ‍ॅप्लीकेशन्सचा वापर करण्यात येत असला तरी याला अनेक मर्यादा असल्याचे स्पष्ट झालेले आहे. नेमक्या याच ठिकाणी जिओ ग्लास उपयोगात येणार आहे. याच्या मदतीने कुणीही विद्यार्थी हा क्लासमध्ये नसतांना वर्गातच असल्याचा फिल घेऊ शकतो.

या माध्यमातून रिलायन्स जिओने थ्रीडी व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यात विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम हा अतिशय मनोरंजक आणि इमर्सिव्ह या पध्दतीत शिकता येणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या वर्गात ताजमहालासारख्या ठिकाणाची माहिती दिली जात असतांना विद्यार्थ्यांना ताजमहालाची अगदी खरीखुरी वाटणारी आभासी सैर देखील घडविता येणार आहे. यात थ्रीडी आणि होलोग्राफीचा वापर केला असल्याने हे उपकरण अन्य क्षेत्रांमध्येही उपयुक्त ठरू शकते. सध्या तरी याचे मूल्य जाहीर करण्यात आले नसले तरी ते किफायतशीर असेल असा अंदाज आहे.

जिओ ग्लासच्या मदतीने थ्रीडी अवतार तयार करून याच्याशी इंटरअ‍ॅक्ट करता येणार आहे. यात दोन अवतार एकमेकांशी संवाद साधू शकणार आहेत. तसेच यात अतिशय दर्जेदार ध्वनीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ग्लासच्या मदतीने युजर संलग्न असणार्‍या स्मार्टफोनवरून कॉल देखील करू शकणार आहे. यात होलोग्राफीक कॉलींगचाही समावेश असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here