जेव्हीसीचा फोर-के स्मार्ट एलईडी टिव्ही

0

जेव्हीसी कंपनीने ४३ इंच आकारमानाचा व फोर-के क्षमता असणारा स्मार्ट एलईडी टिव्ही भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.

गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या निर्मितीत आघाडीवर असणार्‍या जेव्हीसी कंपनीने स्मार्ट टिव्हीच्या मालिकेत जेव्हीसी ४३एन७१०५सी या मॉडेलला भारतीय बाजारपेठेत उपलब्ध केले आहे. याचे मूल्य २४,९९९ रूपये असून ग्राहक याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकतात. वर नमूद केल्यानुसार यात फोर-के म्हणजेच युएचडी ( अल्ट्रा हाय डेफिनेशन ) क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले ३८४० बाय २१६० पिक्सल्स क्षमतेचा असणार आहे. यात क्वॉड कोअर प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी आहे. यात इनबिल्ट साऊंडबार दिलेला असून यात प्रत्येकी २० वॅट क्षमतेचे दोन स्पीकर प्रदान करण्यात आले आहेत. हे स्पीकर डॉल्बी प्रमाणित आणि डायरेक्ट टू हियर साऊंड या प्रणालीने सज्ज आहेत. याच्या मदतीने अतिशय सुश्राव्य ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे.

जेव्हीसीच्या या स्मार्ट टिव्हीमध्ये कनेक्टीव्हिटीसाठी वाय-फायसह दोन युएसबी तर तीन एचडीएमआय पोर्ट देण्यात आलेले आहेत. यात अमेझॉन प्राईम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, युट्युब, हॉटस्टार आदी अ‍ॅप्स प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आलेले आहेत. याशिवाय, या टिव्हीवर सुमारे ५०० अ‍ॅप्सला इन्स्टॉल करून वापरण्याची सुविधा दिलेली आहे. याला डायरेक्ट की रिमोट कंट्रोलच्या मदतीने कार्यान्वित करता येणार असून यासाठी अ‍ॅपदेखील सादर करण्यात आले आहे. ई-शेअर अ‍ॅपच्या मदतीने या टिव्हीवर स्मार्टफोनवरील कंटेंट वापरण्याची सुविधा ग्राहकाला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here