जेव्हीसीच्या स्मार्ट एलईडी टिव्हींची मालिका

0

जेव्हीसी कंपनीने भारतीय बाजारपेठेत सहा स्मार्ट एलईडी टिव्ही सादर केले असून याला फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.

जेव्हीसी ब्रँडची मालकी असणार्‍या विएरा ग्रुपने भारतीय बाजारपेठेत सहा स्मार्ट टिव्ही लाँच केले आहेत. याच्या अंतर्गत जेव्हीसी २४एन३८०सी ( मूल्य ७,४९९); जेव्हीसी ३२एन३८०सी ( मूल्य ९,९९९); जेव्हीसी ३२एन३८५सी ( मूल्य ११,९९९); जेव्हीसी ३९एन३८०सी ( मूल्य १५,९९९) आणि जेव्हीसी ३९ एन३१०सी ( मूल्य १६,९९९) हे मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. या सर्व स्मार्ट टिव्हींमध्ये इंटिलेजीयंट युजर इंटरफेस प्रदान करण्यात आला आहे. यात संबंधीत युजरच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन त्याच्याशी सुसंगत असणार्‍या कंटेंटची माहिती होम पेजवर देण्यात येणार आहे. या सर्व स्मार्ट टिव्हीच्या मॉडेल्समध्ये ५०० पेक्षा जास्त अ‍ॅप्स वापरण्याची सुविधा दिलेली असून यात युट्युब, नेटफ्लिक्स आदी स्ट्रीमिंग सेवांचा समावेश आहे. यात १३६६ बाय ७६८ पिक्सल्स अर्थात एचडी क्षमतांचे डिस्प्ले प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असणार आहे.

डॉल्बी डिकोडर तंत्रज्ञानाने सज्ज असणारे व प्रत्येकी १२ वॅट क्षमतेचे दोन स्पीकर यात प्रदान करण्यात आलेले आहेत. यात मिराकास्ट आणि ई-शेअर अ‍ॅप्सची सुविधा असल्याने युजर आपल्या स्मार्टफोनवरील कंटेंट या स्मार्ट टिव्हीवर पाहू शकणार आहे. या मॉडेल्समध्ये वाय-फाय आणि लॅनसह एचडीएमआय, युएसबी आदी कनेक्टीव्हिटीचे पर्याय देण्यात आले आहेत. याच्या विविध फंक्शन्सचा वापर करण्यासाठी माऊस कर्सरने युक्त असणारा स्मार्ट रिमोट दिलेला आहे. यावर अतिशय सुलभ अशा नेव्हीगेशनची सुविधा देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here