कोडॅकने फोर-के रेझोल्युशन क्षमतेच्या स्मार्ट टिव्हींची मालिका भारतीय ग्राहकांसाठी सादर केली असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.
कोडॅकच्या एक्सप्रो या मालिकेत तीन स्मार्ट टिव्ही लाँच करण्यात आलेले आहेत. यात ४३, ५० आणि ५५ इंच आकारमानाच्या मॉडेल्सचा समावेश आहे. यांचे मूल्य अनुक्रमे २२,४९९; २७,९९९ आणि ३१,९९९ रूपये असून याला फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात आलेले आहेत. या सर्व मॉडेल्समध्ये ३८४० बाय २१६० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आलेला आहे. यात क्वॉड-कोअर ए ५३ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी इतके आहे. सराऊंड साऊंड तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील ध्वनी प्रणाली २४ वॅट क्षमतेची आहे. हे मॉडेल्स अँड्रॉइड ७.१ या प्रणालीवर चालणारा आहे.
कोडॅकडच्या या स्मार्ट टिव्हींमध्ये युट्युब, अमेझॉन प्राईम व्हिडीओ, वुथ, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, झी५ आदी अॅप्स प्रिलोडेड अवस्थेत प्रदान करण्यात आलेले आहेत. कनेक्टीव्हिटीसाठी यात ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, एचडीएमआय आदी पर्याय दिलेले आहेत.