कोडॅकचे दोन एलईडी टिव्ही बाजारपेठेत सादर

0

कोडॅकने ४३ आणि ५० इंच आकारमानांचा डिस्प्ले असणारे दोन एलईडी टिव्ही भारतीय ग्राहकांसाठी सादर केले असून यात उत्तमोत्तम फिचर्स आहेत.

भारतात कोडॅक ब्रँडचा परवाना असणार्‍या सुपर प्लास्ट्रोनिक्स कंपनीने एक्सप्रो या मालिकेत दोन टिव्ही भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत. ४३एफडीएचएक्सप्रो आणि ५०एफडीएचएक्सप्रो या नावांनी हे मॉडेल्स ग्राहकांना फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात आले आहेत. यांचे मूल्य अनुक्रमे २०,९९९ आणि २४,९९९ रूपये इतके आहे. यातील बरेचसे फिचर्स समान आहेत. याच्या अंतर्गत दोन्ही मॉडेल्सची रॅम १ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी इतके आहे. तर दोन्ही मॉडेल्समध्ये फुल एचडी म्हणजे १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा एलईडी डिस्प्ले प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच यात लॅन, वाय-फाय, मिराकास्ट आदी फिचर्स दिलेले आहेत.

४३एफडीएचएक्सप्रो या मॉडेलमध्ये ४३ इंच आकारमानाचा डिस्प्ले दिलेला आहे. यात प्रत्येकी १० वॅट क्षमतेचे ड्युअल स्पीकर देण्यात आलेले आहेत. तर ५०एफडीएचएक्सप्रो या मॉडेलमध्ये ५० इंच आकारमानाचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यातदेखील प्रत्येकी १० वॅट क्षमतेचे दोन स्पीकर दिलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here