किफायतशीर लाव्हा झेड ७१ दाखल

0

लाव्हा कंपनीने आपला झेड ७१ हा किफायतशीर श्रेणीतील स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे.

लाव्हा ही भारतीय कंपनी किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारे मॉडेल्स सादर करण्याबाबत प्रसिध्द आहे. अलीकडच्या काळात चीनी कंपन्यांनी याच प्रकारातील अनेक सरस फिचर्स असणारे मॉडेल्स सादर केल्याने लाव्हा तसेच मायक्रोमॅक्स सह अनेक भारतीय कंपन्यांना दणका बसला आहे. या पार्श्‍वभूमिवर, लाव्हा कंपनीने बर्‍याच कालावधीनंतर झेड ७१ हे मॉडेल ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. याचे मूल्य ६,२९९ रूपये असून ग्राहक याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून रूबी रेड आणि स्टील ब्ल्यू या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात. या स्मार्टफोनमध्ये गुगल असिस्टंटसाठी स्वतंत्र बटन देण्यात आलेले आहे. तसेच याच्या डिस्प्लेवर वॉटरड्रॉप या प्रकारातील नॉचदेखील प्रदान करण्यात आला आहे.

लाव्हा झेड ७१ या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंच आकारनामाचा आणि एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा प्रोसेसर दिला आहे. याच मीडियाटेकचा हेलीओ पी २२ हा प्रोसेसर आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि २ मेगापिक्सल्स कॅमेर्‍यांनी युक्त असणारा ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यातील बॅटरी ३२०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here