फ्लिपकार्टवरून मिळणार लेनोव्हो के १० प्लस

0

लेनोव्होने आपला किफायतशीर मूल्य असणारा के १० प्लस हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला असून याला फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात आले आहे.

लेनोव्होने के १० प्लस हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी लाँच केला आहे. याचे ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज हे एक व्हेरियंट १०,९९० रूपयात फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपासून याला खरेदी करता येईल. या मॉडेलमध्ये किफायतशीर मूल्यात अनेक सरस फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात ६.२२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२३४० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले असून याचा अस्पेक्ट रेशो १९:५:९ असा आहे. या मॉडेलमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६३२ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे.

लेनोव्हो के १० प्लस या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असून याला ८ आणि ५ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांची जोड दिली आहे. तर यामध्ये १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here