लेनोव्होचे नवीन स्मार्टवॉच भारतीय बाजारपेठेत दाखल

0

लेनोव्हो कंपनीने एचएक्स०७ इगो हे नवीन स्मार्टवॉच भारतीय बाजारपेठेत सादर केले असून यात दर्जेदार बॅटरीसह अनेक सरस फिचर्स दिलेले आहेत.

भारतीय युजर्समध्ये स्मार्टवॉच मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत असल्याने अनेक कंपन्या याचे विविध मॉडेल्स सादर करत आहेत. या अनुषंगाने लेनोव्होने एचएक्स०७ इगो या नावाने नवीन स्मार्टवॉच सादर केले आहे. याचे मूल्य १,१९९ रूपये असून याला फ्लिपकार्टसह क्रोम स्टोअरमधून उपलब्ध करण्यात आले आहे.

लेनोव्हो एचएक्स०७ इगो या मॉडेलमध्ये अन्य स्मार्टवॉचप्रमाणे विविध फिचर्स दिलेले आहेत. यातील बॅटरी ही एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २० दिवसांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. याशिवाय, हे मॉडेल वॉयरप्रूफ असून याच्या मदतीने पोहण्याचे मापनदेखील करता येणार आहे. याशिवाय, यात फिटनेस ट्रॅकींगचे अन्य फिचर्सदेखील दिलेले आहेत. यामध्ये हार्ट रेट मॉनिटर असून याच्या मदतीने युजर हृदयाच्या ठोक्यांचे सतत मापन करू शकतो. यातील स्लीप ट्रॅकरच्या मदतीने युजर निद्रेचे मापन करू शकतो. याशिवाय, यातून चालेलेले अंतर व यामुळे खर्च झालेल्या कॅलरीज आदींबाबतचे अचूक मापनदेखील करता येणार आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून हे स्मार्टवॉच स्मार्टफोनशी कनेक्ट करता येते. यावर स्मार्टफोनवरील ई-मेल, एसएमएस, व्हाटसअ‍ॅप मॅसेजेस आदींचे नोटिफिकेशन्सही पाहता येणार आहेत. यात रिमोट कॅमेरा हे बॅटन असून याच्या मदतीने दुरून स्मार्टफोनवरील कॅमेर्‍यातून फोटो काढण्याची सुविधा दिलेली आहे. तसेच यात अलर्ट, रिमाइंडर्स आदींची सुविधादेखील देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here