लेनोव्होचा थिंकपॅड एक्सट्रीम एक्स१ लॅपटॉप

0

लेनोव्हो कंपनीने थिंकपॅड एक्सट्रीम एक्स १ हा उच्च श्रेणीतील लॅपटॉप तीन व्हेरियंटमध्ये भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

गत वर्षीच्या आयएफए-२०१८ या टेकफेस्टमध्ये लेनोव्हो कंपनीने आपले थिंकपॅड एक्सट्रीम एक्स १ हे मॉडेल पहिल्यांदा प्रदर्शीत केले होते. आता हाच लॅपटॉप भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आलेला आहे. हा लॅपटॉप तीन विविध व्हेरियंटच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. यातील बेस व्हेरियंटमध्ये इंटेलचा कोअर आय-५ प्रोसेसर असून याचे मूल्य १.९७ लाख रूपयांपासून सुरू होणारे आहे. याशिवाय, कोअर आय-७ प्रोसेसरसह ५१२ जीबी आणि १ टेराबाईट स्टोअरेजचे व्हेरियंटस् अनुक्रमे २.०४ आणि ३.०२ लाख रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत.

थिंकपॅड एक्सट्रीम एक्स १ या लॅपटॉपमध्ये १५.६ इंच आकारमानाचा आणि फोर-के युएचडी क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. याशिवाय, यात युजरला फुल एचडी डिस्प्ले निवडण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. यातील प्रत्येक व्हेरियंटमध्ये जीटीएक्स १०५० टीआय हा ग्राफीक प्रोसेसरही प्रदान करण्यात आलेला आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये दोन युएसबी ३.१ पोर्ट, दोन युएसबी टाईप-सी थंडरबोल्ट पोर्ट, फोर-इन-वन या प्रकारातील एसडी कार्ड रीडर, एचडीएमआय पोर्ट, ऑडिओ जॅक, वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथ आदी पर्याय दिलेले आहेत. याशिवाय, यामध्ये फास्ट ऑनलाईन आयडेंटीटी ऑथेंटीकेशन प्रणाली, फिंगरप्रिंट रीडर, फेसियल रिकग्नीशनसह विंडोज हॅलो, थिंकशॅटर आणि लॉक स्लाट आदी फिचर्सदेखील दिलेले आहेत. यामध्ये रॅपीड चार्ज तंत्रज्ञानाने युक्त असणारी ८० वॅट क्षमतेची बॅटरी असून ती एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर तब्बल १५ तासांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here