लेनोव्हो टॅब व्ही ७ भारतात लाँच

0

लेनोव्होने आपले टॅब व्ही ७ हे टॅबलेट मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर केले असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

लेनोव्हो टॅब व्ही ७ या मॉडेलला दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे. यात ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेजचे मूल्य १२,९९० तर ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेजयुक्त मॉडेलचे मूल्य १४,९९० रूपये इतके आहे. पहिल्यांदा हा टॅबलेट फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात येणार असून लवकरच याला अमेझॉन इंडियासह देशभरातील शॉपीजमधूनही सादर करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

लेनोव्हो टॅब व्ही ७ या मॉडेलमध्ये ६.९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. याचा मुख्य कॅमेरा १३ तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा देण्यात आलेला आहे. डॉल्बी ऑडिओ प्रणालीचा सपोर्ट असल्यामुळे यात दर्जेदार ध्वनीची अनुभूती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. या टॅबलेटमध्ये ५,१८० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली असून ती दीर्घ बॅकअप देण्यास सक्षम असल्याचे सांगण्यात आले आहे. यात आयरिस रेकग्नीशन प्रणाली दिलेली असून याच्या मदतीने युजरला सुरक्षित लॉगीन करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here