एलजीचा ट्रिपल कॅमेर्‍यांनी युक्त स्मार्टफोन

0

एलजी कंपनीने ट्रिपल कॅमेर्‍यांनी युक्त असणारा एलजी क्यू ६० हा किफायतशीर मूल्य असणारा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे.

शाओमीसह अन्य कंपन्या जोरदार गतीने आगेकूच करत असतांना एलजीसारख्या अनेक कंपन्या तुलनेत थोड्या मागे पडल्या आहेत. या कंपनीने आधी फ्लॅगशीप अर्थात उच्च श्रेणीतील मॉडेल्सवर लक्ष केंद्रीत केले होते. आता मात्र भारतात लोकप्रिय असणार्‍या किफायतशीर मूल्य असणार्‍या वर्गवारीवर एलजीने लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने एलजी क्यू ६० हे मॉडेल सादर करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन १३४९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे. यातील खासियत म्हणजे याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सल्सचा असून याला २ मेगापिक्सल्सचे डेप्थ सेन्सर आणि ५ मेगापिक्सल्सच्या वाईड अँगल सेन्सरची जोड देण्यात आलेली आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असून यात एआय ब्युटिफिकेशन हे विशेष फिचर दिलेले आहे. यात गुगल असिस्टंट स्वतंत्रपणे प्रदान करण्यात आला असून डीटीएस एक्स : थ्रीडी साऊंड प्रणालीदेखील दिलेली आहे. यातील बॅटरी ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारे आहे.

एलजी क्यू ६० या मॉडेलमध्ये ६.२६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा वॉटरड्रॉप नॉच असणारा डिस्प्ले दिला असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here