मारूती सुझुकी अल्टो ८०० ची नवीन आवृत्ती दाखल

0

मारूती सुझुकी कंपनीने अल्टो ८०० या लोकप्रिय मॉडेलची नवीन आवृत्ती विविध व्हेरियंटच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना सादर केली आहे.

नवीन फिचर्स

मारूती सुझुकीचे अल्टो हे सर्वाधीक लोकप्रिय मॉडेल मानले जाते. गत अनेक महिन्यांपासून याची नवीन आवृत्ती येणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर शिक्कामोर्तब करत कंपनीने आज याची नवीन (फेसलिप्ट) आवृत्ती ग्राहकांना सादर केली. नावातच नमूद असल्यानुसार यात मूळ आवृत्तीपेक्षा काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. यात प्रामुख्याने डिझाईन, अंतर्गत भाग आणि सुरक्षाविषयक फिचर्समध्ये बदल करण्यात आलेला आहे. यात आता ड्रायव्हरच्या बाजूने सुरक्षेसाठी एयर बॅगची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच यात ईबीडी प्रणालीसह एबीएस सिस्टीम प्रदान केलेली आहे. या नवीन आवृत्तीमध्ये रिअर पार्कींग सेन्सर, सिटबेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टीमचाही अंतर्भाव केलेला आहे. याशिवाय, कारची डिझाईनदेखील थोड्या प्रमाणात बदलण्यात आलेली आहे.

सीएनजीचा पर्याय नाही

मारूती सुझुकीच्या नवीन अल्टो ८०० या मॉडेलमध्ये ७९६ सीसी क्षमतेचे, थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन प्रदान करण्यात आले आहे. हे इंजिन बीएस-६ या मानकानुसार विकसित करण्यात आले असून याला ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समीशन प्रणालीशी संलग्न करण्यात आले आहे. यात सीएनजीचा पर्याय दिलेला नाही.

विविध व्हेरियंटचे मूल्य

मारूती सुझुकीच्या नवीन अल्टो मॉडेलच्या विविध व्हेरियंटचे एक्स-शोरूम मूल्य हे स्टँडर्ड आवृत्ती २.९४ लाख; स्टँडर्ड (ओ) २.९७ लाख; एलएक्सआय ३.५० लाख; एलएक्सआय (ओ) ३.५५ लाख आणि व्हीएक्सआय ३.७२ लाख रूपये इतके आहे. कंपनीच्या देशभरातील शोरूम्समधून याचे विविध व्हेरियंटस् विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here