मेव्होफिट ड्राईव्ह रन फिटनेस बँड सादर

0

मेव्होफिटने मेव्होफिट ड्राईव्ह रन हा फिटनेस बँड भारतीय ग्राहकांना सादर केला असून यात फिटनेस ट्रॅकरसह स्मार्टवॉचच्या फिचर्सचा समावेश आहे.

अलीकडच्या काळात वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्याजोगी उपकरणे लोकप्रिय झाली आहेत. या पार्श्‍वभूमिवर, मेव्होफिट ड्राईव्ह रन हे मॉडेल ४,९९० रूपये मूल्यात बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे. हे मॉडेल फ्लिपकार्टसह कंपनीच्या ई-स्टोअरवरून ब्लॅक, ब्ल्यू आणि पर्पल या तीन रंगाच्या पर्यायात खरेदी करता येणार आहे. यात ०.९६ इंच आकारमानाचा टिएफटी डिस्प्ले दिला असून यात सहा प्रकारचे युजर इंटरफेस वापरता येणार आहेत. याला अ‍ॅपच्या मदतीने स्मार्टफोनशी संलग्न करता येणार आहे. यामुळे यावरून विविध नोटिफिकेशन्स पाहता येणार आहेत. याचा डिस्प्ले वॉटरप्रूफ असून तो विषम तापमानातही वापरता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात इनबिल्ट जीपीएस ट्रॅकरदेखील प्रदान करण्यात आलेला आहे.

मेव्होफिट ड्राईव्ह रन फिटनेस बँडच्या मदतीने युजर आपल्या विविध प्रकारच्या व्यायामांचे अचूक मापन करू शकतो. यात चालेलेले अंतर, यातून वापरण्यात आलेल्या कॅलरीज, धावणे/पोहणे आदींसारख्या प्रकारांचे मापन आदी फिचर्सचा समावेश आहे. यात एकूण २४ विविध प्रकारच्या व्यायाम प्रकारांचे मापन करता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामध्ये दर्जेदार बॅटरी दिली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे पाच दिवसांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here