मायक्रोमॅक्सची अँड्रॉइड टिव्हींची नवीन मालिका

0

मायक्रोमॅक्सने गुगल सर्टीफाईड अँड्रॉइड प्रणालीवर चालणार्‍या स्मार्ट टिव्हींची मालिका भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे.

स्मार्टफोनसह अन्य उपकरणांच्या निर्मितीत ख्यातप्राप्त असणार्‍या मायक्रोमॅक्सने स्मार्ट टिव्हींची नवीन मालिका भारतीय ग्राहकांना सादर केली आहे. याची खासियत म्हणजे हे सर्व टिव्ही गुगल प्रमाणित आहेत. यामुळे गुगल प्ले स्टोअरचा अ‍ॅक्सेस युजर्सला मिळणार आहे. यावरून कुणीही गेम्स, चित्रपट, अ‍ॅप्स आदींचा वापर करू शकतो. यात गुगलचे क्रोमकास्ट हे उपकरण इनबिल्ट अवस्थेत दिलेले असल्यामुळे स्मार्टफोनसह अन्य स्मार्ट उपकरणांवरील कंटेंट हे सहजपणे टिव्हीवर पाहता येणार आहे. तर यात गुगल असिस्टंटही दिलेला असल्यामुळे युजर व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने विविध फंक्शन्सचा वापर करू शकणार आहे. हे स्मार्ट टिव्ही ३२, ४० आणि ४३ इंच आकारमानांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. याचे मूल्य १३,९९९ रूपयांपासून सुरू होणारे आहे. हे सर्व मॉडेल्स फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. यात डॉल्बी डिजीटल साऊंड प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. यात वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथची कनेक्टीव्हिटीही दिलेली आहे.

यासोबत मायक्रोमॅक्सने पूर्णपणे स्वयंचलीत असणार्‍या टॉप लोडींग वॉशिंग मशिन्सची मालिकादेखील बाजारपेठेत सादर केली आहे. यांचे मूल्य १०,९९० रूपयांपासून सुरू होणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here