मायक्रोसॉफ्टचे सरफेस गो मॉडेल भारतात सादर; अगावू नोंदणीस प्रारंभ

0
मायक्रोसॉफ्ट सरफेस गो,microsoft surface go

मायक्रोसॉफ्टने आपले सरफेस गो हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर केले असून याची फ्लिपकार्टवरून अगावू नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

मायक्रोसॉफ्टने या वर्षीच्या जुलै महिन्यात सरफेस गो हे एंट्री लेव्हलचे मॉडेल बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली होती. याला आता भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात येत आहे. याची आता फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून विक्रीपूर्व नोंदणी सुरू करण्यात आली आहे. याचे ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटचे मूल्य ३८,५९९ तर ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटचे मूल्य ५०,९९९ रूपये आहे. यासोबत या मॉडेल्ससाठी दोन कव्हरदेखील सादर करण्यात आले असून त्यांचे मूल्य ८,६९९ आणि ११,७९९ रूपये इतके आहे.

सरफेस गो टॅबलेटमध्ये याच मालिकेतील प्रिमीयम मॉडेल्सप्रमाणेच अतिशय आकर्षक अशी डिझाईन प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये स्टँडचा समावेश आहे. यात १० इंच आकारमानाचा व ३:२ अस्पेक्ट रेशो असणारा पिक्सलसेल या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला असून याचे रेझोल्युशन १८०० बाय १२०० पिक्सल्स इतके आहे. यामध्ये इंटेलचा सातव्या पिढीतील पेंटीयम गोल्ड ४४१५वाय हा प्रोसेसर देण्यात आला आहे. वर नमूद केल्यानुसार याची रॅम ४ व ८ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेजसाठी ६४ आणि १२८ जीबी असे पर्याय आहेत. या दोन्ही व्हेरियंटमधील स्टोअरेज वाढविता येणार आहे. हे मॉडेल विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारे असेल.

सरफेस गो या मॉडेलमध्ये अतिशय दर्जेदार बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ९ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात युएसबी टाईप-सी पोर्टदेखील देण्यात आले आहे. तर सरफेस कनेक्टरच्या मदतीने हा टॅबलेट डेस्कटॉपला जोडण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यासोबत कंपनीने दर्जेदार किबोर्ड, माऊस, कव्हर सादर केले आहे. तर सरफेस पेनच्या मदतीने यावर कुणीही रेखाटन करू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here