मायक्रोसॉफ्टच्या सरफेस हब २ एस मॉडेलचे अनावरण

0

मायक्रोसॉफ्टने तब्बल ५० इंच डिस्प्ले असणार्‍या सरफेस हब २ एस या मॉडेलने अनावरण केले असून यात अनेक उत्तमोत्तम मॉडेल्सचा समावेश आहे.

मायक्रोसॉफ्टने अलीकडेच सरफेस बुक २ या मॉडेलला सादर केले होते. यानंतर आता सरफेस हब २ एस हे मॉडेल सादर करण्यात आले आहे. खास करून प्रोफेशनल्सला डोळ्यासमोर ठेवून हे मॉडेल तयार करण्यात आलेले आहे. यात तब्बल ५० इंच आकारमानाचा आणि फोर-के क्षमतेचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यावर अँटी ग्लेअर कोटींग देण्यात आलेले आहे. यामध्ये इंटेलचा आठव्या पिढीचा कोअर आय ५ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आलेला आहे. याची रॅम ८ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी इतके आहे. यावर स्टायलस पेनचा सपोर्ट दिलेला आहे. याच्या मदतीने या मॉडेलच्या डिस्प्लेवर रेखाटन करून नोटस् घेता येणार आहेत. यासोबत फोर-के क्षमतेचा रोटेट होणारा कॅमेरा देण्यात आला असून तो डिस्प्लेवर कुठेही संलग्न करता येणार आहे. तर यामध्ये सब-वुफरसह इनबिल्ट स्टिरीओ साऊंड सिस्टीम दिली असून याच्या मदतीने सुश्राव्य ध्वनीचा आनंद घेता येणार आहे.

मायक्रोसॉफ्टच्या सरफेस हब २ या मॉडेलमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी चार युएसबी टाईप-सी पोर्ट, एक युएसबी-ए पोर्ट, एचडीएमआय, इथरनेट आदींसह वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथचे पर्याय दिलेले आहेत. हे मॉडेल जूनपासून बाजारपेठेत उपलब्ध होणार असून याचे जागतिक बाजारपेठेतील मूल्य ८,९९९ डॉलर्स (सुमारे ६.२४ लाख रूपये ) आहे.

पहा : सरफेस हब २ एस मॉडेलची माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here