‘या’ अ‍ॅपच्या मदतीने संगणकावरून करता येणार कॉल !

0

मायक्रोसॉफ्टने विंडोज १० प्रणालीच्या युजर्ससाठी माय फोन अ‍ॅप सादर केले असून याच्या मदतीने संगणकावरून कॉल करण्याची सुविधा मिळणार आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने ऑक्टोबर महिन्यात निवडक डेव्हलपर्ससाठी माय फोन अ‍ॅप सादर केले होते. आता याची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर हे अ‍ॅप सर्व युजर्ससाठी सादर करण्यात येत असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. हे अ‍ॅप विंडोज १० प्रणालीच्या युजर्ससलाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याच्या मदतीने युजर्स आपला अँड्रॉइड स्मार्टफोन संगणक वा लॅपटॉपला संलग्न करू शकतो. यात संगणकावर स्मार्टफोनचे एसएमएस, व्हाटसअ‍ॅप मॅसेज आदींसह विविध नोटिफिकेशन्स पाहता येतील. यासोबत यावर डायलींगची सुविधा दिलेली असून याच्या मदतीने कुणीही संगणकावरूनच हव्या त्या व्यक्तीला कॉल करू शकतो. यासोबत आलेला कॉल स्वीकारणे अथवा नाकारणे या सुविधाही युजर्सला प्रदान करण्यात आल्या आहेत. यात फोनबुक सर्च करता येणार असून फोनवरील कॉल हिस्ट्रीदेखील पाहता येणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या माय फोन अ‍ॅपच्या माध्यमातून आधीच एसएमएस, इमेज शेअरींग आदींची सुविधा दिलेली होती. यात आता कॉलींगची सुुविधा मिळणार असल्याने युजर्सला याचा लाभ होणार असल्याचे मानले जात आहे.

मायक्रोसॉफ्टचे माय फोन अ‍ॅप हे विंडोज स्टोअरवरून येथे क्लिक करून युजर्सला आपल्या संगणकावर इन्स्टॉल करावे लागणार आहे. यासोबत युजरने आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर गुगल प्ले स्टोअरवरून माय फोन अ‍ॅप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. यानंतर दोन्ही अ‍ॅपच्या मदतीने स्मार्टफोन आणि संगणकाला एकमेकांशी संलग्न करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here