मोटोरोलाचा ७५ इंची फोर-के स्मार्ट टिव्ही

0

मोटोरोलाने ७५ इंच आकारमानाचा आणि फोर-के रेझोल्युशन क्षमता असणारा स्मार्ट टिव्ही भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

मोटोरोलाने गेल्या महिन्यातच भारतीय ग्राहकांना टिव्हींची मालिका सादर केली होती. यात ३२, ४३, ५० आणि ५५ इंच आकारमानाच्या मॉडेल्सचा समावेश होता. यानंतर आता या कंपनीने ७५ इंच आकारमानाचे मॉडेल लाँच केले आहे. आधीच्या मॉडेल्सनुसार हा टिव्हीदेखील अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारा आहे. यात गुगल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला असून युजर याच्या मदतीने व्हाईस कमांड अर्थात ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने सर्च करू शकतो. तर यात १६ जीबीचे इनबिल्ट स्टोअरेज दिलेले आहे.

वर नमूद केल्यानुसार याचा डिस्प्ले फोर-के अर्थात अल्ट्रा हाय डेफिनेशन क्षमतेचा म्हणजेच ३८४० बाय २१६० पिक्सल्स क्षमतेचा आहे. याचा अस्पेक्ट रेशो १६:९ असून व्ह्यूइंग अँगल १७८ अंशाचा आहे. यात डॉल्बी व्हिजन आणि एचडीआर १० तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे युजरला अतिशय दर्जेदार व सजीव वाटणार्‍या चलचित्राचा आनंद घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात प्रत्येकी ३० वॅट क्षमतेच्या दोन स्पीकर्सने युक्त असणारी ध्वनी प्रणाली देण्यात आलेली आहे. यात डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस सराऊंड साऊंड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. या स्मार्ट टिव्हीचे मूल्य १,१९,९९९ रूपये असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here