सुरक्षित फाईल्स ट्रान्सफरसाठी फायरफॉक्स सेंड टुल

0

मोझिलाने युजर्सला सुरक्षितपणे हेवी फाईल्स शेअर करण्यासाठी फायरफॉक्स सेंड हे नवीन टुल सादर करण्याचे जाहीर केले आहे.

जास्त आकारमानाच्या फाईल्स शेअर करण्यासाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यात आता फायरफॉक्स सेंड या नवीन टुलची भर पडणार आहे. याचे सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे या टुलच्या माध्यमातून एंड-टू-एंड एनक्रिप्शन या प्रकारात फाईल्स शेअर करता येणार आहेत. अर्थात, या फाईल्स कुठेही ऑनलाईन स्टोअर होणार नाही. यामुळे युजर्सची गोपनीयता कायम राखण्यात येणार आहे.

फायरफॉक्स सेंड ही सेवा वापरण्यासाठी अतिशय सुलभ अशी आहे. कुणीही युजर https://send.firefox.com या लिंकवर जाऊन आपल्याला हवी ती फाईल अपलोड करू शकतो. सध्या फायरफॉक्सकडे नोंदणीकृत असणार्‍या युजरला २.५ जीबी तर नोंदणी न केलेल्याला २.५ जीबी इतक्या आकारमानापर्यंत फाईल्स पाठविता येणार आहे. कुणीही आपल्या संगणकात हवी असणारी फाईल यावर अपलोड करू शकतो. एकदा का ही फाईल अपलोड झाली की, याच्या डाउनलोडची लिंक देण्यात येणार आहे. ही लिंक संबंधीत युजर स्वत: वापरू शखतो, अथवा दुसर्‍यांना देऊ शकतो. विशेष बाब म्हणजे ही लिंक काही काळानंतर आपोआप नष्ट होणारी आहे. आणि वर नमूद केल्यानुसार ही फाईल कुठेही सेव्ह होणार नाही. यामुळे गोपनीय फाईल्सच्या शेअरिंगसाठी हे टुल अतिशय उपयुक्त ठरणार आहे. याला फायरफॉक्ससह अन्य ब्राऊजरवरही वापरता येणार आहे. तसेच लवकरच याला अँड्रॉइड प्रणालीसाठीही उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मोझिलातर्फे देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here